top of page

लक्ष्मण हाकेंचा माळी समाजाबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; लक्ष्मण हाकेंचा वेगळाच दावा !

ree

नांदेड: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, यामध्ये त्यांनी माळी समाजातील नेत्यांवर टीका केली होती. यानंतर ओबीसी आंदोलनात फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले असून आता हाके यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

लक्ष्मण हाके हे एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत. ओबीसींचं नेतृत्व धनगर समाजाकडे जात असल्याने माळी समाजातील नेत्यांमध्ये पोटदुखी सुरू झाली आहे, असं या व्हिडिओमुळे लक्ष्मण हाके बोलताना पाहायला मिळत आहोत. त्यांचा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर ओबीसी समाजात फूट पडल्याचे चित्र असून हाके यांच्यावर चहुबाजूने टीका होऊ लागली आहे.


त्यानंतर आता हाके यांनी खुलाा करत संताप व्यक्त केला आहे. “ मी यशवंत होळकरांची औलाद आहे, समोर वार करतो, फेक व्हिडिओ पसरून ओबीसी समाजामध्ये फूट पाडण्यासाठी शांतापने रचलेलं हे षडयंत्र आहे,” असा पलटवार लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ओबीसी जोडो अभियानाच्या बैठकीसाठी लक्ष्मण हाके हे आज नांदेड दौर्‍यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.


“ मी गेल्या दोन वर्षापासून ओबीसींसाठी लढा देत आहे. दररोज दोन हजार लोकांशी मी संवाद साधत असतो. मी स्पष्टवक्ता आहे. पोटात एक आणि ओठावर एक, असं मी करत नाही. मला असं काही करायची गरज नाही. चार लोक आहेत, ते फेक व्हिडिओ पसरून ओबीसी समाजामध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र रचत आहेत. वेळ आल्यावर आम्ही त्यांची नावे जाहीर करू, ” असा इशाराही लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.


माळी समाजाबद्दल वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्पष्टीकरण देताना लक्ष्मण हाके म्हणाले की, “ ओबीसी नेते छगन भुजबळ आणि माझ्यात सकाही संभाषण झालं आहे. माझ्या नेत्याची माझ्या पाठीवरील थाप लढा लढण्यासाठी उर्जा करणारी आहे. मी माझ्या आयुष्यात महात्मा ज्योतीराव फुले, दिवंगत हरी नर्के यांना आदर्श मानत आलो. आता ओबीसी नेते छगन भुजबळ यांना आदर्श मानतो. माझं आणि छगन भुजबळ यांच काय नातं आहे, हे भुजबळ साहेबाना चांगलं माहित आहे, तेव्हा असे फेक व्हिडिओ पसरून ओबीसी कधीही दुभंगणार नाही, ” असं मत हाके यांनी व्यक्त केलं.


लक्ष्म्ण हाके यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लक्ष्मण हाके यांनी माफी मागावी असं वाघमारे म्हणाले. पण मी चूक केलीच नाही तर माफी मागायचा प्रश्न उरत नाही. नवनाथ वाघामरे माझे चांगले मित्र आणि सहकारी आहेत. त्यांचा गैरसमज झाला असेल. आम्ही एकत्र येऊन ओबीसीची लढाई लढत आहोत. आमच्यात गैरसमज पसरून जर कोणी ओबीसींचं आंदोलन थांबवू पाहत असेल तर ते आम्ही सहन करणार नसल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले.


Comments


bottom of page