top of page

लाडकी बहिण योजनेच्या निकषात बदल; या महिलांना मिळणार 500 रुपये

Apr 16, 2025
1 min read




लाडकी बहिण येाजनेवरुन महारष्ट्रात पुन्हा एकदा राजकारण सुरु झाले आहे. महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा योजनेत बदल केला आहे. या योजनेअंतर्गत 8 लाख महिलांना 1500 रुपयांऐवजी 500 रुपये सरकारी नियमांनुसार 1500रुपये फक्त अशा लाभार्थ्यांना दिले जातील. ज्यांना इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही.


या बदलानंतर, ‘नमो सिान सन्मान निधी’ चा लाभ घेणार्‍या महिला शेतकर्‍यांना आता लाडकी बहिण योजनेअंतर्गत फक्त 500 रुपये मिळतील. नमो किसान सन्मान योजनेअंतर्गत, राज्य सरकार सहा हजार रुपये आणि केंद्र सरकार सहा हजार रुपये देते. अशा प्रकारे एकून 12 हजार वार्षीक तर लाडकी बहिन योजनेंतर्गत 18 हजार दिले जातात. त्यामुळे किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणार्‍या भगिनिंना उर्वरित फक्त वार्षीक सहा हजार आणि दरमहा 500 रुपये फरक म्हणून मिळतील.


प्रत्यक्षात, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अट अशी आहे की जर त्यांना इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. आता यावर राजकारण सुरू झाले आहे. निवडणूकी दरम्यान मते मिळविण्यासाठी सरकारने ही योजना आणली असे विरोधकांचे म्हणणे आहे.


आता सरकार हळूहळू ही योजना कमी करेल आणि बंद करेल, सरकार आपल्या लाडक्या बहिणींना फसवत आहे. या योजनेच्या अटींचे पालन करणार्‍या महिलांच्या रकमेत कोणतीही कपात केली जाणार नाही असे सरकार म्हणत असताना, विरोधक मात्र गोंधळ निर्माण करत आहेत.


यासोबतच सरकार लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थींची तपासणी देखील करत आहे. जेणेकरुन योग्य लोकांनाच लाभ मिळावा, ऑक्टोबरमध्ये या योजनेसाठी 2.63 कोटी अर्ज आले होते. तपासानंतर फेब्रूवारीपर्यंत ही संख्या 11 लाखांवरुन 2.52 कोटींवर आली. फेब्रूवारी आणि मार्च मध्ये फक्त 2.46 लाख महिलांना पैसे मिळाले.

Comments


bottom of page