top of page

लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील, रविंद्र चव्हाणांचे वादग्रस्त वक्तव्य

लातूर: भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. लातुरमध्ये कार्यकर्ता मेळाव्यास संबोधीत करताना रविंद्र चव्हाण यांनी स्व. विलासराव देशमुख यांच्या बाबत वक्तव्य केल्याने मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे.


प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करताना दिसून येत आहेत. एकनाथ शिंदे, अजित पवार, आणि आता स्व. विलासराव देशमुख यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. लातुरमध्ये आज कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यता आले होते.


मेळाव्यास उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधीत करताना रविंद्र चव्हाण म्हणाले की, ‘ तुमचा सर्वांचा उत्साह पाहता असे वाटते, लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील’ या वक्तव्यामुळे काँग्रेसकडून जोरदार पलटवाराची शक्यता आहे. स्व. विलासराव देशमुख हे लातुरच्या राजकारणाचं प्रतीक मानले जातात. त्यामुळे रविंद्र चव्हाण यांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली असून नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रविंद्र चव्हाण नेहमीच वादग्रस्त वक्तव्यासाठी चर्चेत राहिले आहेत. मात्र, आज लातुरमधील कार्यकर्ता मेळाव्यात स्व. विलासराव देशमुखांच्या बाबतीलं हे वादग्रस्त वक्तव्य सामांन्याच्याही जिव्हारी लागल्याचे बोलले जात आहे.

Comments


bottom of page