top of page

वाल्मिक कराड जेलमध्ये असतानाही ब्रॅण्डिंग- समर्थकाकडून क्यूआर कोडवरून फंडिंग

ree

सरंपच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या नावाचे ब्रॅण्डिंग करण्यासाठी समर्थकांकडून क्यूआर कोड वरून फँडिंगचा नवा फंडा वापरला जातोय. त्यासंबंधीचे बॅनर देखील समोर आले आहेत.


बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या समर्थनाचे बॅनर भगवान भक्तीगडावरील पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात काही समर्थकांकडून दाखवण्यात आले, त्याची मोठी चर्चाही झाली. त्यानंतर याच दसरा मेळाव्याचवा अनुषंगाने वाल्मीक कराड याचा फोटो टाकून क्यूआर कोड टाकून दसरा मेळाव्याच्या चहापानासाठी तसेच आल्पोपहारासाठी पैसे गोळा करण्यात आले.


तसेच हा क्यूआर कोड आणि मदतीचे आवाहन दोन दिवसांपासून फिरत होते. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आहे. त्याची ओळख आणि खून प्रकरणातून त्याचे नावा पुसायला नको. तो पुसण्याचा त्याच्या समर्थकांचा प्रयत्न आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि बीडचे पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे. जोपर्यंत संबंधित आरोपींवर कारवाई होणार नाही तोपर्यंत आरोपीचे उद्दातीकरण केले जाईल. असे धनंजय देशमुख म्हणाले.


समाज माध्यमांवर व्हायरल होणारे बॅनर आणि त्यावरील मजकूर खूप धक्कादायक आहे. तांदळे नामक गुंड आहे, त्यानेच हे बॅनर बनवले. त्याच तांदळे नामक नावाच्या गुडाने मला, जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होल्या. या मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा फोटो टाकून आर्थिक सहाय्य मागत आहेत.


त्यांना गुन्हेगारी संघटना मजबूत करायची आहे. त्यासाठी थेट बॅनरवार स्कॅनर लावून मदत मागितली जाते, हे पालिसांना दिसत नाही का? पोलिसांनी तात्काळ आरोपींवर कारवाई केली पाहिजे. नाही आम्ही पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करू, असे विजयसिंह उर्फ बाळा बांगर म्हणाले. समाजमाध्यमांवर व्हायरल होणारे बॅनर विषयी संदीप तांदळे याने बनल्याचा दावा करण्यात येत आहे.

Comments


bottom of page