वाल्मिक कराडच्या लेकाचा फेसबुकपोस्टद्वारे इशारा ! सर्वांसमोर सर्व काही बोलणार!, सुशील कराड नेमका कोणता गौप्यस्फोट करणार ?
- Navnath Yewale
- 2 hours ago
- 2 min read

बीड: मस्साजोग (जि. बीड) चे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. या घटनेनंतर राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या कारागृहात आहे. त्यातच प्रथम उच्च व त्यानंतर आता सर्वाच्च न्यायालयानेही वाल्मिक कराडचा जामिन अर्ज फेटाळल्याने कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मिक कराड हा प्रमुख सूत्रधार म्हणून पोलिस यंत्रणेचा अहवाल न्यायालयासमोर मांडण्यात आला आहे. वाल्मिक कराडकडून जामिनासाठी प्रयत्न होत आहेत. आधी सत्र न्यायालय त्यानंतर उच्च न्यायालय आणि आता सर्वोच्च न्यायालयाकडूनही कराडला दिलासा मिळालेला नाही. न्यायालयीन पातळीवर अपयश आल्याने कराड कुटुंबाची अडचण वाढली असतानाच आता वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याने केलेल्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ उडाली आहे.
सुशील कराड याने आपल्या फेसबुक पोस्टवर ‘आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार’ अशा आशयाची पोस्ट टाकली आहे. या पोस्टमुळे अनेक तर्क वितर्कांना उधान आले आहे. परळीतील व्यापारी महादेव मुंडे, संतोष देशमुख प्रकरणातील सर्व होणार का याची उत्सुकता आहे. यापैकी नेमक्या कोणत्या गुन्ह्याबाबत सुशील कराड काय बोलणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वाल्मिक कराडवर गंभीर स्वरुपाचे आरोप होत असून तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. न्यायालयाने जामीन नाकारताना गुन्ह्याचे गांभीर्य, तपासाची दिशा आणि पुरव्यांची शक्यता लक्षात घेतल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अरोपीस तात्पुरता दिलासा देणे योग्य ठरणार नाही, असे न्यायालयाचे मत आहे. दरम्यान, सुशील कराडच्या पोस्टनंतर सोशल मिडियावर चर्चेला उधान आले आहे . आता वाल्कि कराडचा मुलगा सुशील कराड नेमकं काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना आहे. विशेष म्हणजे वाल्मिक कराडचा जामिन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर आज त्याच्या मुलाने केलेली ही फेसबुक पोस्ट व्हायरल केली आहे.
या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणाही सतर्क झाल्या असून, सुशील कराडकडून कोणते महत्वाचे खुलासे होतात का? याकडे त्यांचे बारकाईने लक्ष आहे. आगामी काळात या प्रकरणात नवे पुरावे समोर येतात का? आणि तपासाची दिशा बदलते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एकूणच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आणि सुशील कराडच्या पोस्टनंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.



Comments