विकृत, भोंदूबाबा अशोक खरातचे व्हिडिओ बाहरे कसे आले, पोलिस आयुक्तांनी सांगितलं व्हायरल सत्य
- Navnath Yewale
- 1 day ago
- 1 min read

नाशिक: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचे एकामागून एक कारनामे समोर येत आहेत. इतकेच नाही तर दमदाटी करुन, धमक्या देऊन त्याने मोक्याच्या जमिनीही लाटल्याची माहिती समोर येत आहे. त्याचे गारेखधंदे अजूनही बाहेर येत आहेत. तर या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची पहिली विकेट पडली आहे. अशोक खरातच्या संपूर्ण प्रकरणावर नाशिकचे विद्यमान पोलिस आयुक्त संदीप कर्णीक यांनी माहिती दिली आहे. अशोक खरातचे व्हिडिओ नेमकं बाहेर कसे आले? याबाबतची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे.
अशोक खरातचे पालिसांकडे जे व्हिडिओ आले त्यातील एकही व्हिडिओ बाहेर गेला नसल्याची माहिती पोलिस आयुक्त संदीप कर्णीक यांनी दिली. ऑफिस बॉयच्या सात महिने प्रेग्नंट असणार्या बायकोसोबत अश्लिल कृत्य केले. त्यानंतर ऑफिस बॉय खरातच्या विरोधात गेला होता. त्याने काही रेकॉर्ड केले. ते व्हिडिओ त्याने वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले होते. माझ्या जीवाला काही बरे वाईट झाले तर हे व्हिडिओ बाहरे आणावेत. ज्यांच्याकडे ऑफिस बॉयने व्हिडिओ ठेवले होते. त्यांनी देखील इतरांकडं व्हिडिओ ठेवले होते. त्यातूनच हे व्हिडिओ बाहरे आले आहेत असे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले.
दरम्यान, ऑफिस बॉयने जीवाच्या भीतीने अशोक खरातचे व्हिडिओ वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले होते असे पोलिस आयुक्त म्हणाले. आम्ही 65 ट्विटर आणि फेसबुकवर, इन्स्टाग्रामवर गुन्हा दाखल केला आहे. काही व्हिडिओ मॉर्फ देखील केले आहेत, त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस आयुक्त म्हणाले. बर्याच ठिकाणाहून अशोक खरातकडे लोक येत होते. महाराष्ट्रासह बाहेरच्या राज्यातून देखील येत होते. अशोक खरातच्या सगळ्या व्हिडिओंची संख्या खूप मोठी असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली. यामध्ये काही व्हिडिओ रिपीटेड देखील आहेत.



Comments