top of page

विधान परिषदेच्या 6 जागांवर शिवसेनेत लॉबिंग, एकनाथ शिंदे कुणाला देणार संधी ; तिन आमदारपुत्रांची नावे आघाडीवर

मुंबई: विधान परिषदेच्या 6 जागांवरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. याच 6 जागांवर शिवसेनेत इच्छुक उमेदवारांकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे. यात ठाणे- पालघरमधून रवींद्र फाटक यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. तर हिंगोली- परभणीमधून रवींद्र फाटक यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. तर हिंगोली-परभणीमधून आमदार अर्जुन खोतकर यांचे चिरंजीव अभिमन्यू खोतकर आणि माजी आमदार विप्लव बाजोरीया यांचे नाव चर्चेत आहे. छत्रपती संभाजीनगर-जालनातून जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांचेही नाव चर्चेत आहे. शिवाय बाजीराव चव्हाणही इच्छुक असल्याची माहिती आहे. नाशिकमधून माजी खासदार हेमंत गोडसे आणि भाऊसाहेब चौधरी यांच्या नावाची चर्चा आहे. रायगडमधून मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या नावाची चर्चा आहे.


जळगाच्या जागेसाठीही शिवसेना आग्रही असून या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील यांचे पूत्र प्रतापराव पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. तर यवतमाळबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नसल्याचे कळते. तसेच यामधील शिवसेनेला 5 जागा मिळाव्यात ही आग्रही मागणी असून सहावी जागा मेरिटवर किंवा जिल्ह्यातील पक्षाची ताकद पाहता द्यावी, अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. यात सहावी जागा ही छत्रपती संभाजीनगर किंवा रायगड ही जागा मिळावी, अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे.


दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 6 जागांची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. नाशिक ठाणे आणि जळगावच्या जागांसाठी शिवसेनेने आग्रही भूमिका घेतली होती. आतापर्यंत झालेल्या बैठकीत शिवसेनेला ठोण, नाशिक, यवतमाळ आणि परभणीची जागा सुटल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच राज्यात न झाल्याने या मतदारसंघामध्ये पूर्वी निवडणून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही निवडणूक होऊ शकली नाही. अशात, गेल्या दोन ते अडीच वर्षापासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या 75 टक्के मतदार संख्या असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्य संख्येपैकी 22 सदस्य सथानिक स्वराज्य संस्थाद्वारे निवडून जात असतात. सोलापूर, आहिल्यानगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पणे, भंडारा- गोंदिया, नाशिक, अमरावतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुक होणार आहे.


विधान परिषद निवडणुक कार्यक्रम:

दि. 25 मे निवडणुकीची अधिसूचना, दि. 1 जून अर्ज भरण्याची शेवटची तारीख, दि. 2 जून उमेदवारी अर्जांची छाननी, दि. 4 जून अर्ज माघारी घेण्याची मुदत, दि. 18 जून मतदान(सकाळी 8:00 ते दुपारी 4:00), दि.22 जून मतमोजणी

Comments


bottom of page