top of page

विमान दुर्घटनेतील त्या 33 जणांच्या कुटुंबियांना मिळणार एक कोटी अहमदाबाद विमान अपघातामध्ये 274 जणांचा मृत्यू

ree

अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या 274 वर पोहोचली आहे. यात विमानातील प्रवासी, क्रू मेंबर्स, पायलट यांच्यासह अन्य सामान्य नागरिकांचा देखील समावेश आहे. एअर इंडियाचे बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमान मेघानीनगर मधील एका निवासी डॉक्टर्सच्या हॉस्टेलवर कोसळले होते. हॉस्टेलमधील आणि त्याच्या आसपास असणारे जे लोक अपघातात मृत्यूमुखी पडले, त्यांच्या कुटुंबियांना टाटा ग्रूपद्वारे भरपाई दिली जाणार आहे.


एअर इंडियाचे विमान बीजे कॉलेजच्या हॉस्टेलवर धडकले. अनेक डॉक्टर, वैद्यकिय शिक्षण घेणारे विद्यार्थी रुग्णालयातील कर्मचारी आणि हॉस्टेलजवळ राहणार्‍यांचा जीव अपघातात गेला. तेथील मृताची संख्या 33 आहे. या 33 जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची भरपाई टाटा ग्रूपने जाहिर केली आहे. अपघातात जखमी झालेल्यांच्या वैद्यकिय उपचारांवर होणारा खर्च देखील टाटा ग्रूप उचलणार आहे. मेडिकल हॉस्टेलच्या पुनर्बांधणीसाठी टाटा ग्रूप मदत करणार आहे.

ree

एअर इंडियाच्या विमानामध्ये 242 जण होते. यात प्रवासी,10 क्रू मेंबर्स आणि 2 पायलट यांचा समावेश होता. यातील एकमेव प्रवासी बचावला आहे. अपघातात बीजे मेडिकल कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आणि त्याच्या आसपास 33 जणांचा बळी गेल्याची शक्यता आहे. या सर्वांच्या कुटुंबियांना टाटा ग्रूपद्वारे आर्थिक मदत केली जाणार आहे.


दरम्यान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांच्या व्यतिरिक्त विमा कंपन्याकउून सुमारे 1.5 कोटी रुपये भरपाई म्हणून मिळतील. एअर इंडियाच्या पॉलिसीसाठी टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स (40% पेक्षा जास्त हिस्सा असलेली मुख्य कंपनी), आयसीआयसीआय लोम्बार्ड, न्यू इंडिया अ‍ॅन्शुरन्स आणि काही सरकारी जनरल इन्शुरन्स कंपन्या काम पाहतात.

Comments


bottom of page