वृद्ध महिलेच्या डोक्यात घातला दगड, अपंग पतीला विहिरीत फेकलं; दुहेरी हत्याकांडाने खळबळ
- Navnath Yewale
- 7 days ago
- 2 min read

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात एक अत्यंत क्रूर आणि अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. फक्त ‘ए चोरा’ अशी हाक मारल्याच्या रागातून एका वृतद्ध महिलेचा खून करण्यात आला आणि तिच्या अपंग पतीला थेट विहिरीत फेकून देण्यात आलं. या दुहेरी हत्याकांडानं संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. आरोपी गावातीलच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एखाद्याचा अपमान करणं जिवावरही बेतू शकतो, याचा प्रत्यय लातूरच्या रेणापूरात आला आहे. ‘ए चोरा’ अशी कायम मस्तीत हाक मारणार्याचा थेट खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेणापूर तालुक्यातील गरसुळीमधील कातळे दाम्पत्याकडे 7 एक्कर जमीन असून त्यांना एकच मुलगा आहे. तो हैदरबादला नोकरी करतो. कातळे दाम्पत्य गरसुळी शिवारातील आखाड्यावर राहत होतं.
मध्यरात्री आरोपी पंडित रावणकुळे दारुच्या नशेत आखाड्यावर गेला. पत्र्याच्या शेडमध्ये कातळे दाम्पत्या बसलेलं होतं. रावणकुळे यांन शेजारीच चुलीवर पडलेला कुकर पुष्पलता कातळे यांच्या कानावर मारला. यात त्यांचा कान तुटला आणि त्या रक्तबंबाळ झाल्या त्यानंतर दगड उचलून त्यांच्या डोक्यात घालून त्यांना ठार केलं. दिव्यांग रावसाहेब कातळे यांनी आरडाओरड केल्यानंतर आरोपीनं त्यांना उचलून विहिरीत फेकून दिलं.
कातळे दाम्पत्याचा खून केल्यानंतर संशयित रावणकुळे यांन पळून जाताना पुष्पलता यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून नेलं होतं. तपासात मृत महिलेचं मंगळसूत्र चोरीला गेल्याचं नातेवाईकांना लक्षात आल्यानं त्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सर्वप्रथम संशयित म्हणून पंडित रावणकुळे याला ताब्यात घेतलं . त्यानंतर पोलिसांनी हिसका दाखवताच संशयितानं गुन्ह्याची कबुली दिली. या क्रूर घटनेनंतर धक्कादायक बाब म्हणजे या दुहेरी खुनाची घटना समजताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झालं. यावेळी गावातील नागरिकांनी गर्दी केली होती. या गर्दीत हा आरोपी रावणकुळे हा देखील तो दुहेरी हत्याकांड पाहण्यासाठी उभा होता अशी माहिती आहे.
ही घटना कवेळ एक दुहेरी हत्या नाही.. ती गावकुसातल्या मानसिकतेचा, सूडभावनेचा आणि वैयक्तिक अपमानाच्या प्रतिक्रियेचा भीषण उद्रेक आहे. ए चोरा या एका हिनवणार्या शब्दातून जन्मलेला राग इतका धगधगता ठरला की त्यानं दोघांचा जीव घेतला. हा गुन्हा क्षणिक नाही. तो मनात साचत गेलेला विषाचा स्फोट होता. आता आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे, पण गावात अजूनही भीती आणि अस्वस्थता आहे.
Comments