वेड्यात काढू नका, नाही तर रस्ते बंद होतील- जरांगे पाटील
- Navnath Yewale
- 1 day ago
- 2 min read

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. वेड्यात काढू नका नाही तर रस्ते बंद होतील असा इशारा जरांगे पाटील यांनी शुक्रवारी (दि.31) माध्यमांशी बोलताना दिला.
सरकार दिलेल्या अश्वासनाची आंमलबजाणी करण्यात दिरंगाई करत असून मराठा आरक्षणाबाबत दुटप्पी भूमिका बजावत असल्याचा अरोप करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी (दि. 29) आंतरवाली सराटीमध्ये आयोजीत बैठकीत 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले की, हे आंदोलन निर्णयाक असेल. देवेंद्र फडणवीस त्या दिवशी ताबडतोब प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले की, अर्जाची टेडन्सी नाही, मी तुम्हाला टेंडन्सी दाखवतो, तुमचा माणूस पाठवा असंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले. तुम्ही आंतरवालीत या आम्ही तुम्हाला उत्तर देतो. समोरासमोर मराठ्यांना कळू द्या, की मराठे जी माहिती सांगत आहेत ती चुकीची आहे की सरकार सांगते ती माहिती चुकीची आहे. मराठ्यांना एकदा कळूच द्या,असंही जरांगे पाटील म्हणाले.
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, तुम्ही म्हणतात बलिदान देणार्या कुटुंबाला नोकर्या दिल्या आहेत म्हणून, मी तुम्हाला दाखवतो, नोकर्या मिळाल्या नाहीत, तुम्ही म्हणता ना 900 केसेस मागे घेतल्या, त्या केसेस तशाच आहेत हे देखील मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही म्हणता 58 लाख कुणबी नोंदीनुसार प्रमाणपत्र दिले, मी तुम्हाला दाखवतो तुम्ही प्रमाणपत्र दिले नाहीत म्हणून, तुम्ही म्हणतात ना सगळे व्यवस्थित चाललय,परंतु एक वर्षाचा काळ गेल्या 29 ऑगस्ट 2025 पासून आता 26 पर्यंत रेकॉर्ड समितीने नोंदीच शोधल्या नाहीत, असंही यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले.
एकनाथ शिंदे साहेबांना सहाच महिन्याचा वेळ दिला होता, 58 लाख नोंदी त्या माणसाने शोधल्या. तुम्हाला सांगायला गेलं तर तुम्ही म्हणता आमचं नावच घेत नाहीत. मी आता विखे पाटील आणि फडणवीस साहेबांचा जप सुरू केला आहे, तरीसुद्धा तुम्ही मागण्या मान्य करत नाहीत. 58 लाख नोंदी कमी करू नका, त्यातील एकही नोंद कमी करू नका, सध्या नोंदी कमी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तुम्ही आम्हाला येड्यात काढायचं काम करू नका, नाहीतर रस्ते बंद होतील, असा इशाराही जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.



Comments