विद्यार्थ्यांनी नाही, तर भाजपच्या गुंडांनी दगडफेक केली, ..तर सीजेपी देशव्यापी आंदोलन उभारेल - अभिजीत दिपके
- Navnath Yewale
- 7 hours ago
- 1 min read

छत्रपती संभाजीनगर: दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या यूजी नीट पेपरफुटी विरोधातील आंदोलनावरून कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) आणि सत्ताधारी पक्षामध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांवर दगडफेक झाल्याचा अरापे भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. त्यानंतर जखमी पोलिसांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत आंदोलनातील काही आंदोलकांवर गंभीर आरोप केले आहेत. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी हे आरोप फेटाळून लावत दगडफेक विद्यार्थ्यांनी नाही, तर भाजपच्या गुंडांनी केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे अभिजीत दिपके यांनी माध्यमांसी संवाद साधताना हे आरोप फेटाळून लावत सरकारवर निशाना साधत भाजपवर गंभीर आरोप केले. त्यांनी आंदोलन पूर्ण शांततापूर्ण असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केल.
आंदोलनादरम्यान, विद्यार्थ्यांनी कोणतीही दगडफेक केली नसून, जंतरमंतर परिसरात धुसलेले भाजपशी संबंधित गुंडच हिंसाचाराला जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
अभिजीत दिपके पुढे बोलताना म्हणाले, आंदोलन सुरू असताना दगडांनी भरलेला एक ट्रक घटनास्थळी होता. या ट्रकबाबत त्यांनी दिल्ली पोलिसांकडे विचारणा केली असता तो दिल्ली महापालिकेचा असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आंदोलनस्थळी दगडांनी भरलेला ट्रक कसा पोहोचला, याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. “ ज्यांनी प्रत्यक्ष दगडफेक केली त्यांच्यावर कारवाई करा, पण त्याचा आधार घेत निष्पाप विद्यार्थ्यांना लक्ष्य करू नका” असंही दिपके म्हणले.
दिपके यांनी आंदोलनादरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर अत्याचार झाल्याचे गंभीर आरोप केले. काही विद्यार्थीनींना मारहाण करण्यात आली, त्यांच्या कपड्यांची ओढाताण झाली आणि महिला विद्यार्थ्यांवर अमानुष वर्तन झाल्याचा दावा त्यांनी केला. या सर्व घटना कॅमेर्यात कैद झाल्या असून, त्याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला, तर सीजेपी पुन्हा देशव्यापी आंदोलन उभारेल. जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराबाबत दिल्ली पोलिसांचा तपास सुरू असून, या प्रकरणात दोन्ही बाजूंनी गंभीर आरोप- प्रत्यारोप करण्यात येत आहेत.



Comments