(व्हिडिओ)भोंदूबाबा खरात प्रकरणात ‘लेडी अका’; रुपाली चाकणकरांना सर्व गुन्ह्यात सह आरोपी करा - दिपक केदार चाकणकरची 24 तासात हाकालपट्टी करा; महाराष्ट्र भोंदूबाबा जेफ्रि एपस्टिन फाईल राज्यासमोर आणा
- Navnath Yewale
- 18 hours ago
- 2 min read

नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर या ‘लेडी आका’ आहेत. पक्ष आणि सरकारने येत्या 24 तासात त्यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी. भोंदूबाबा खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करण्याची मागणी ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दिपक केदार यांनी सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर करत केली आहे.
चेहरा पाहून भविष्य सांगणार्या तथाकथित, स्वयंघोषित ज्योतिषकार कॅप्टन अशोक खरात यास महिलेच्या लैंगिक शोषणाच्या आरोपखाली अटक करण्यात आली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या भोंदूबाबाच्या डोक्यावर छत्री पकल्याच्या फोटोसह एका कार्यक्रमात भोंदूबाबाला माझी गुरुमाऊली असा उल्लेख व त्याची पाद्यपुजा केलेला व्हीडिओ व्हायरल झाल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
त्याचबरोबर त्यांच्याच पक्षातील रुपाली पाटील ठोंबर यांनी रुपाली चाकणकरांचा राजीनाम्याची मागणी केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांसह शिवसेना नेत्या सुषमा आंधारे, करुणा मुंडे यांनी तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. तर खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राची एपस्टिन फाईल असा उल्लेख करत भोंदूबाबा खरातला कोण वाचवतय असा सवाल उपस्थित केला आहे.
ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दिपक केदार यांनी सोशल मिडियावरुन सरकारला अल्टीमेटम देत रुपाली चाकणकर यांची येत्या 24 तासात महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टीची मागणी केली आहे. सोशल मिडियाच्या फेसबुकच्या अधिकृत अकाऊंडवर व्हिडिओद्वारे दिपक केदार म्हणाले की, भोंदूबाबा अशोक खरात या बलात्कारी बाबाचे जे-जे कांड आहेत आणि ज्या-ज्या ठिकाणी एफआयआर होती त्या सर्व एफआयआरमध्ये रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करण्यात यावं.
रुपाली चाकणकर याप्रकरणात ‘लेडी आका’ भूमिकेत आहेत. या लेडी आकामुळेच खरातला राजकीय वरदहस्त मिळाला आहे. त्यामुळेच अशोक खरात याने अनेक कांड केले, लूटमार केली भोंदूगिरीने अपार संपत्ती मिळविली आणि या सगळ्याची भागिदार रुपाली चाकणकर आहेत. गोल-गोल आणि क्लिनचिट देण्याची भूमिका पक्ष, सरकारने घेतली तर याचे परिणाम राज्यभर दिसल्याशिवाय राहणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पुढे बोलताना केदार म्हणाले की, ऑल इंडिया पँथ सेना राज्यसरकारला अल्टीमेटम देत आहे की येत्या 24 तासात रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून तात्काळ हकालपट्टी करावी, अन्यथा राज्यभर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल. राज्यसरकारकडे मागणी आहे की 200 कोटीच्या आसपास या भोंदूबाबाने संपत्ती गोळा केली, भोंदूबाबासहीत चाकणकर या दोघांची संपत्ती सरकारने जप्त केली पाहीजे, आणि कठोर शिक्षा केली पाहीजे. शिवाय अशोक खरात या भोंदूबाबावर मोक्का अंतर्गत करवाईची मागणीही दिपक केदार यांनी केली.
दिपक केदार यांनी नाशिक पोलिसांनाही सवाल केला आहे, ते म्हणाले की, माझी नाशिक पोलिस अधिक्षकांना सवाल आहे की इतर प्रकरणांमध्ये हात-पाय बांधून लंगडत-लंगडत ‘ नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला’ म्हणून घेत आरोपींचे व्हिडिओ व्हायरल केलेत. अशोक खरात याचा व्हिडिओ ‘ नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला ’ असा म्हणणारा व्हिडिआ का व्हायरल झाला नाही.
म्हणून, एवढ्या वर्षे नाशिक पोलिसांच्या नाकाखाली हा गोरख धंदा सुरू होता. या संबंधीत जे पोलिस ठाणे, पोलिस अधिकारी आहेत त्यांचेही निलंबन झाले पाहिजे. येणार्या 24 तासांत रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेऊन याप्रकरणात ‘लेडी आका’ नावाची जी भूमिका आहे महाराष्ट्र भोंदूबाबा जेफ्रि एपस्टिन फाईल राज्यासमोर आली पाहिजे अशी मागणीही ऑल इंडिया पॅथर सेनेचे अध्यक्ष दिपक केदार यांनी केली आहे.



Comments