top of page

(व्हिडीओ): नांदेडमध्ये दिव्यांग बांधव आक्रमक! तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्याची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, परिसरात चक्काजाम

नांदेड : महाराष्ट्रातील सनदी अधिकारी आणि नुकतेच दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावरुन बदली करण्यात आलेले आयएएस तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील दिव्यांंगांनी आज बुधवार (दि.8) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन केले.


तुकाराम मुंढे यांची बदली रद्द झालीच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. विशेष म्हणजे मुढे यांची बदली रद्दच्या मागणीसाठी संघटनेचे राहूल साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग बांधवांनी मंत्रालयातील मुख्यमंत्री यांच्या दलनासमोर आंदोलन केले होते.


दिव्यांग संघटनेचे राहुल साळवे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाभरातील दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्काजाम करत प्रशासनाचे मागण्यांकडे लक्ष वेधले. आयएएस तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्यासह इतर मागण्यांसाठी दिव्यांग बांधवांनी मोर्चाकाढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्का जाम केला.

राज्य सरकारने आयएएस आधिकार्‍यांच्या बदल्यांचा धडका लावला आहे. राज्य शसनाने मंगळवारी सायंकाळी आणखी 11 आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. तत्पूर्वी गेल्याच आठवड्यात राज्यातील 25 आयएएस अधिकार्‍यांच्या बदलींचा आदेश जारी करण्यात आला होता. यामध्ये काहींना महत्वाच्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे. दरम्यान काहींना महामंडळ व प्राधिकरणाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. तर धडाडीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची दिव्यांग विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन , पुनर्वसन व मदत कार्य विभागात बदली करण्यात आली आहे.


मात्र दिव्यांग विभागाचे सचिव असताना दिव्यांगांसाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे दिव्यांग बांधवांनी त्यांच्यापदी आदर व्यक्त करत त्यांची बदली रद्द करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी मंत्रालय परिसरात दिव्यांग बांधवांनी याच मागणीसाठी एकत्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दालना बाहेर आंदोलन केले होते. तर आज नांदेडमध्ये तुकाराम मुंढेची बदली रद्द करावी, अशी मागणी करत दिव्यांग बांधवांनी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयामसोर चक्काजाम आंदोलन केले.


दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात विधिमंडळ अंदाज समितीची बैठक सुरू होती. या बैठकीवेळी दिव्यांग बांधव कर्तव्यनिष्ठ अधकिरी तुकाराम मुंढे यांच्या बदलीवरून आक्रमक झाल्याचं दिसून आले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

Comments


bottom of page