शपविधीबाबत आम्हाला कोणालाही माहिती नव्हती , तेरावा होईपर्यंत राजकीय भाष्य करणार नाही- आमदार रोहित पवार
- Navnath Yewale
- 2 days ago
- 2 min read

अजित दादांची बातमी आपण ऐकली, बातमी खरी आहे का स्वत्न आहे हे आम्हालाही कळत नाही. आजपर्यंत आम्ही त्या दु:खात आहोत, त्या विमानात आणखी जे होते त्यांचाही परिवार दु:खात होता. काही दिवसांपूर्वी कळले की, दिंडोरी तालुक्यातील सुदाम बोडके हे अजित दादांचे आणि साहेबांचे कट्टर कार्यकर्ते आहेत. जेव्हा त्यांना अजित दादांच्या निधनाची बातमी कळली, तेव्हा अस्वस्थ झाले नंतर ते हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. आज पवार परिवार आणि हा परिवार दु:खात आहे. त्यामुळे मी बोडके कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले, असे आमदार रोहित पवार म्हणाले. तसेच, 9 तारखेपर्यंत मी कुठलीही राजकीय चर्चा करणार नाही. अजित दादांच्या तेराव्याचा कार्यक्रम झाल्यानंतरच मी राजकीय विषयावर भाष्य करेन असंही रोहित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, तेरावा ज्या दिवशी होईल, त्या दिवशी मी पत्रकार परिषद घेऊन सांगेल, आता राजकयी बोलणे योग्य नाही. दादांसोबत काय चर्चा झज्ञली, सगळ्या प्रक्रियेत मी होतो, मात्र तेरा दिवसांनी सांगेल, असे म्हणत रेाहित पवारांनी व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्यू अजित दादांसोबत काय चर्चा झाली, याबाबतचे बोलणे सध्यातरी टाळले. तसेच सुनत्रा पवार यांच्या शपथविधी सोहळ्यावरही रोहित पवारांनी परखडपणे भूमिका मांडली.
अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा आहे, त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेताना पक्षाचे सुनली तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल होते. या नेत्यांची सुनेत्रा काकी यांच्याशी चर्चा झाली असेल, राजकारणात अनुीव कमी असला तरी त्या अनेक वर्षापासून समाजकारणात काम करतात, असे रोहित पवार म्हणाले. तसेच शपथविधी होणार असल्याचे आम्हाला कोणालाही माहित नव्हते, लाखो लोक बारामतीमध्ये पवार कुटुंबाला भेटण्यासाठी येत होते. पार्थ देखील होता, संपूर्ण महाराष्ट्र येऊन भेटत नाही, सांत्वन करत नाही तोपर्यंत आपण बारामतीत थांबले पाहिजे. आम्हाला शपविधिीची बातमी देखील टीव्हीच्या माध्यमातून कळाली, असे म्हणत कुटुंबीयांना शपविधी सोहळ्याची माहिती नव्हती असंही रोहीत पवारांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, राजक ठाकरे यांनी केलेल्या ट्विटसंदर्भात रोहित पवार यांनी बोलणे टाळले. मी ते ट्विट बघितले नाही, राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबत तसे दिसत नाही. मात्र, पियुष गोयल यांच्या ट्विटबद्दल मी तेरावा झाल्यानंतरच बोलेल. असंही आमदार रोहित पवार म्हणाले.



Comments