top of page

कोणाला भेटणं,कोणाबरोबर फोटो असणं हा काही गुन्हा नाही- दिपक केसरकरांचा सुषमा अंधारेवर पलटवार

राज्यात नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण गाजत असून राजकीय नेत्यांची नावेही समोर येत आहे. तसेच, राजकीय नेत्यांवर आरोपही केले जात आहेत. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेत एसआयटी आणि गृहमंत्र्यांना सवाल केले आहेत. महायुतीमधील नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिपक केसरकरांना चौकशीला बधी बोलवणार? असा सवाल त्यांनी केला. अशोक खरातचे समोर आलेला सीडीआर खरा आहे की खोटा आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. जर ते खरे असतील तर दिपक केसरकर आणि एकनाथ शिंदे यांना चौकशीला कधी बोलणार? असे त्यांनी म्हटले होते. आता सुषमा अंधारेंच्या प्रश्नावर केसरकर प्रत्युत्तर दिलं आहे.


अशोक खरात प्रकरण आणि सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांसदर्भात एसआयटी आणि ईडी दोन्ही चौकशा चालू आहेत. कुठं चुकून जरी नांव मिळालं, तरी त्या व्यक्तीला बोलावलं जातं. शेवटी कोणाला भेटणं किंवा कोणाबरोबर फोटो असणं, हा काही गुन्हा होऊ शकत नाही. त्यामुळे केवळ प्रत्येेक गोष्टीला राजकीय वळण देणं हे योग्य नाही, असं दिपक केसरकर यांनी सुषमा अंधारेंच्यवा आरोपावर पलटवार केला. एसआयटी आणि ईडीला त्यांचं काम करू द्या. जिथे जिथे त्यांना कोणाची नोंद मिळते, त्यावेळी त्यांनी चालगल्या-चांगल्या लोकांना बोलावलेलं आहे. त्यामुळे माहिती घेण्यामध्ये काहीच चुकीचं नाही. माझा काही संबंध नसताना विनाकारण आमची नावं घेणं, केवळ आमची ओळख आहे म्हणून, आरोप करणे हे अत्यंत चुकीचं असल्याचंही केसरकर म्हणाले.


सुषमूा अंधारेच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं कुठलंही बंधन हे माझ्यावर नाही. त्या एक राजकीय व्यक्ती आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या आम्हाला बदनाम करण्याचा त्या प्रयत्न करणार. परंतु त्याची उत्तरं आम्ही दिली पाहिजेत असं बिलकुल नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की, या संदर्भात मी काहीही बोलणार नाही. एसआयटी आणि ईडी त्यांची कारवाई करेल, असे म्हणत सुषमा अंधारे यांचे आरोप राजकीय असल्याचे केसरकर यांनी म्हटले.


दरम्यान, शिवसेना पक्षात अंतर्गत खदखद असल्याबाबत त्यांना विचारणा केली असता, हे जे प्रश्न आहेत, ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. कुठेही जर काही चुक झालेली असेल, एखाद्या मंत्र्याकडून चूक झालेली असेल,तर त्यांना बोलवून योग्य त्या सूचना एकनाथ शिंदे देतील त्यामुळे पक्षामध्ये ही नाराजी पुढच्या काळात राहणार नाही, असे स्पष्टीकरण दीपक केसरकर यांनी दिले.

Comments


bottom of page