शाळेतून घरी निघालेल्या 11 वर्षीय चिमुकलीवर अॅसिड हल्ला!
- Navnath Yewale
- 4 days ago
- 2 min read
वडिल हयात नाहीत, आईच्या मोलमजुरीवर उपजिवीका; गरीबीशी झुंजणार्या मुलीचा संघर्ष अज्ञात नराधमाला खूपला

आहिल्यानगर : शाळा सुटली, घरची ओढ लागली होती आणि चिमुकली पावले घराच्य दिशेने पडत होती. पण नियतीच्या मनात काहीतरी भलतंच होतं. आहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. 6 वी मध्ये शिकणार्या एका निष्पाप विद्यार्थिनीवर अज्ञात नराधमाने ऐसिड हल्ला केला आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होण्यापूर्वी घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्हा हदरुन गेला असून पालकांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे.
वडगाव पान येथील शाळेत ही मुलगी 6 वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शाळा सकाळी लवकर भरतात. नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर ही मुलगी आपल्या घराच्या दिशेने निघाली होती. ती गावच्या रस्त्याने जात असताना अचानक एक अज्ञात युवक तिच्या समोर आला. काही समाजण्याच्या आतच त्या नराधमाने या चिमुकलीच्या चेहर्यावर अॅसिड फेकले आणि तिथून पळ काढला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे मुलगी वेदनेने विव्हळू लागली आतणि तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली.
मुलीचा आवाज ऐकताच आसपाचे नागरिक तातडीने मदतीसाठी धावून आले. मुलीच्या चेहर्याची गंभीर अवस्था पाहून तिला तातडीने लोणी येथील प्रवरा नगर हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सध्या तिच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलिस सतर्क झाले असून वरिष्ठ अधिकार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.
घटनेचे गांभीर्य राखून संगमनेर उपविभागाचे पोलिस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, पोलिस निरिक्षक प्रवीण साळुंखे, पोलिस उपनिरिक्षक श्रीकांत सावंत, पोलिस कर्मचारी अमित महाजन आणि सचिन उगले यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने परिसराची नाकेबंदी केली असून आरेापीचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे कामही पोलिसांनी हाती घेतले आहे.
दरम्यान, पिडित मुलीची कौटुंबीक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे, तिचे वडिल हयात नसून ती आपली आई आणि आजी-आजोबांसोबत राहते. तिची आई मोलमजुरी करून घराचा गाडा चालवते. अत्यंत गरीबीत शिक्षण घेणार्या या मुलीवर असा अमानुष हल्ला कोणत्या करणातून झाला, याचे गूढ अद्याप कायम आहे. पोलिस या प्रकाणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून आरोपीला लवकर बेड्या ठोण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.



Comments