top of page

शिरुरच्या मुख्यरस्त्यावरील अतिक्रमण धारकांना नोटीस, सहा दिवसांची मुदत , दुसर्‍या टप्प्यातील अतिक्रम निष्काशीत मोहिम; स्वयंपूर्तीने नाल्यांवरील अतिक्रमण हटवण्याचे आवाहन


बीडच्या शिरुर कासार शहरातील छत्रपती संभाजीमहाराज चौक- नगपंचायत कार्यालयाच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आले. त्यानंतर टप्प्या टप्प्याने शहरातील अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे निर्देश देत मुख्यकार्यकारी अधिकारी गणेश दहिफळे यांनी दुसर्‍या टप्यात जिजामाता चौक ते छत्रपती संभाजी चौक या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या नाल्यावरील अतिक्रमण धारकांना नोटीस बजावल्या असून स्वयंपूर्तीने अतिक्रमण हटवण्यासाठी सहा दिवसांची मुदत दिली आहे.


पार्कींगचा अभाव, मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण, निमुळत्या रस्त्यामुंळे वाहतुकीस अडथळा त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास. त्यातच बाजारपेठेला बसत असलेले स्थालांतराचे हादरे रोखण्यासाठी नगरपंचायतचे मुख्यकार्यकारी अधिकारी गणेश दहिफळे यांनी शहरात अतिक्रमण हटवण्याची मोहिम राबवण्यास सुरूवात केली. दरम्यान, अधिनियमानुसार अतिक्रमण धारकांना प्रथम नोटीस बजावून, मुदतीच्या सवलतीनुसार कारवाई करण्यात येत आहे. शिरुरकरांच्या हितासाठी सकारात्मक दृष्टीकोण समोर ठेवून टप्प्या-टप्प्याने ही मोहिम राबवण्यात येणार असल्याचे मुख्याधिकार्‍यांनी सूचित केले होते.


त्यानुसार पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीमहाराज चौक ते नगरपंचायत कार्यालय या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण नुकतेच हटवण्यात आले.


दुसर्‍या टप्प्याच्या यशस्वी कारवाईसाठी मंगळवारी (दि.20) शहरातील जिजामाता चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या नाल्यावरील अतिक्रमणधारकांना नोटीस बाजवल्या आहेत. त्यानुसार स्वयंपूर्तीने अतिक्रमण काढण्यासाठी सहा दिसांची मुदत देण्यात आल्याचेही मुख्याधिकारी दहिफळे यांनी सांगितले.


दरम्यान, नोटीस बजावण्यापूर्वी मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणधारकांना पूर्व सूचनेची चाहूल लागावी या उद्देशाने अनाधिकृत होर्डींग,बोर्ड हटवण्यात आले. त्यानुसार अतिक्रमण हटावण्याचा पुढच्या टप्प्यानुसार नोटीसा बाजावण्यात आल्या.


कोणाचीही गय केली जाणार नाही: शहरातील वाहतूकीस अडथळा ठरणारे सरसकट अतिक्रमण हटवण्यात येणार आहेत. जिजामात चौक ते बाजारतळ या मुख्य रस्त्यावरील चौकातील अतिक्रमण, बाजारतळावरील मुख्य रस्त्यावरील, बाजारपेठेतील नाल्यावरील अतिक्रमण टप्प्या-टप्प्याने हटवण्यात येणार आहेत. यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही.

गणेश दहिफळे

मुख्याधिकारी नगरपंचायत कार्यालय

Comments


bottom of page