संतोष देशमुख हत्या प्रकरण: वाल्मिक कराडाच्या अडचणीत वाढ, महत्वाचे डिजिटल पुरावे कोर्टात सादर
- Navnath Yewale
- Feb 8
- 1 min read

बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडच्या अडचणीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मा. न्यायालयात हे प्रकरण आता चार्जफेम झाले असून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील डिजिटल पुराव्यांंची प्रत न्यायालयामध्ये सादर करण्यात आली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे.
संतोष देशमुख यांच्या निर्घुन हत्या प्रकरणातील सूत्रधार वाल्मिक कराड यांचे अवादा पवन चक्कीला गेलेला फोन त्याचबरोबर व्हिडिओ ऑडिओ क्लिप, या संपूर्ण पुराव्यांची यादी आता न्यायालयामध्ये सादर करण्यात आली आहे.
दरम्यान, वाल्मिक कराड यांने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला होता. मात्र, जिल्हा व सत्र न्यायालयाच्या दोष निश्चिती निर्णयानंतर औरंगाबाद उच्च न्यायालयातील अर्ज मागे घेण्यात आला होता. त्यानंतर आता प्रकरण चार्जफेम होताना मा. न्यायालया समोर महत्वाचे डिजिटल पुरावे सादर करण्यात आले आहेत.
त्यामुळे वाल्मिक कराडसह विष्णू चाटे, सुदर्शन घुले व इतर आरोपींची देखील अडचण वाढली आहे आणि ज्हिा कारागृहामधील मुक्काम आणखी वाढणार आहे. दरम्यान या प्रकरणाला वर्षे उलटली तरी सरंपच संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाला अद्यापही न्याय मिळालेला नाही.



Comments