संतोष देशमुख हत्या प्रकरण: विशेष न्यायालयात दोन्ही पक्षाकडून आरोप-प्रत्यारोपांचा युक्तीवद कोर्ट परिसरात तणावाचे वातारण; वाल्मिक कराडचा सुप्रिम कोर्टाचा आदेश विशेष कोर्टात सादर
- Navnath Yewale
- 3 hours ago
- 2 min read

बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणी शुक्रवारी (दि.6) न्यायालयातील सुनावणी दरम्यान सरकारीपक्षाचे वकील उज्वल निकम आणि आरोपींचे वकील एकमेकांना भिडल्याचे दिसून आले. त्यामुळे न्यायालयाच्या आवारातील वातावरण चांगलेच तापले होते. दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या युक्तीवादात सुनावणी पार पडली दि.24 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
बीडच्या विशेष न्यायालयात शुक्रवारी (दि.6) संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. मा. न्यायालयाने डिजिटल, इलेक्ट्रॉनिक पुरावे आरोपी पक्षाला देण्यात यावेत अशा सूचना कोर्टाने सरकारी पक्षाला दिल्या. तपासाशी संबंधीत महत्वाचे डिजिटल पुरावे आरोपींना उलब्ध करू देण्याबाबत कोर्टाने स्पष्ट निर्देश दिल्यानं पुढील सुनावणीपूर्वी या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे.
आरोपी विष्णू चाटेच्या जेल ट्रान्सपर संदर्भात अर्जावरही आज न्यायालयात सुनावणी झाली. या आर्जावर कोर्टाचा आदेश येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच प्रकरणातील आरोपी महेश केदार याने नविन वकिलाची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर जयराम चाटे याने न्यायालयात अर्ज करत भावाच्या मृत्यू नंतर धार्मीक विधीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. येत्या 13 तारखेला हा धार्मीक विधी आहे असे त्याने अर्जात नमूद केले आहे.
या अर्जावर सरकारी पक्षाने त्यास जाण्यास हरकत नसल्याचं कोर्टात म्हटलं आहे. या सुनावणी दरम्यान वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुप्रिम कोर्टाने दिलेला आदेशही आज न्यायालयासमोर सादर करण्यात आला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी माझा संबंध नाही, मला यातून दोषमुक्त करा अशी मागणी वाल्मिक कराडची आहे. हिच मागणी करत त्याने सत्रन्यायालयापासून उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत जामिन अर्ज केला. मात्र, मागील आठवड्यात सर्वोच्य न्यालयानं वाल्मिक कराडच्या या जामिन अर्जावर सुणावनी घेण्यास नकार देत वाल्मिक कराडचा जामिन अर्ज फेटाळला.
दरम्यान आरोपी जयराम चाटे याने न्यायालयात आणखी एक अर्ज केला आहे.त्याचं स्वत:चं वकिलपत्र केवळ अॅड. वाघीरकर यांच्याकडेच राहील असं त्याने स्पष्ट केलं आहे. न्यायालयात सुनावणी दरम्यान तणावाचं वातारण निर्माण झाल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे सरकारी वकिल उज्वल निकम यांनी आरोपी पक्षाकडून या प्रकरणात दिरंगाई केली जात असल्याचा युक्तीवाद केला. त्यावर आरोपी पक्षाकडून प्रतिवाद करत सरकारी पक्षाकडून कागदपत्र वेळेवर दिले जात नाहीत, त्यामुळेच दिरंगाई होते असा युक्तीवाद केला. दोन्ही पक्षाकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात आल्याने कोर्ट परिसरात काही वेळ तणावाचे वातारण निर्माण झाले होते. पुढील सुनावणी दि. 24 मार्च रोजी होणार आहे.



Comments