top of page

संतोष देशमुख हत्याप्रकरण: फरार कृष्णा आंधळे तीनवेळा गावात येऊन गेला, धनंजय देशमुख यांचा दावा

बीड: दिवंगत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे तीन वेळा गावी येऊन गेला. आरोपी मोबाईल वापरत नसल्याने त्याला पोलिस शोधू शकले नाहीत. मात्र तो गावात येऊन गेल्याची माहिती पोलिसांनीही दिल्याचा दावा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी शनिवारी (दि.21) माध्यमांशी बोलताना केला.


मस्साजोग (जि.बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुन हत्याकांडामध्ये कृष्णा आंधळे हा प्रमुख आरोपी आहे, तो वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरुन काम करत असे. त्यानेच आवादा कंपनीच्या प्रमुखांना खंडणी मागितली होती. हत्याकांडामध्ये त्याची प्रमुख भूमिका होती. मात्र, तो पोलिसांना अद्यापर्यंत सापडला नाही. आता या प्रकरणात आरोपी निश्चिती झाल्यामुळे कृष्णा आंधळे याचा शोध जवळपास थांबलाच आहे.


शनिवारी माध्यमांशी संवाद साधताना धनंजय देशमुख म्हणाले की, या प्रकरणातील एक लॅपटॉपमधील फाईल मिळणे अद्याप बाकी आहे. आता प्रकरण साक्षी पुराव्यासाठी न्यायालयासमोर येईल. आरोपीनी आता विधिज्ञ बदलण्याची मागणी केली आहे. येत्या सहा मार्च रोजी या प्रकरणातील पुढील तारीख असून तेव्हा आरोपींचे सील केलेल्या खात्यातील रक्कम व संपत्ती जप्त करण्याची कारवाई करावी अशी मागणी सरकारी वकील उज्वल निकम करू शकतील.


या प्रकरणात गेल्या सहा महिन्यात कृष्णा आंधळे तीन वेळा गावी येऊन गेला असल्याची माहिती होती ती गुन्हा अन्वेषण विभागाला दिली. आरोपी मोबाईल वापरमत नसल्याने त्याला पकडण्यात अडचणी आल्या. पण त्यावर मात करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. पण कृष्णा आंधळे बाहेर राहिला तर आमच्या कुटुंबीयांच्या जिवीत्वास धोका आहे. कृष्णा आंधळे फरार होण्यास तत्कालीन केज आणि धारुर पोलिसच कारणीभूत असल्याचा अरोपही धनंजय देशमुख यांनी केला.



कृष्णा अंधळेला संतोष देशमुख हत्याकांडातील खोलातल्या अनेक बारकावे माहिती असतील, आणि म्हणूनच 13 ते 14 महिने झाले, तरी अजुनही तो कोणाला मिळत नाही. पोलिसांना, सीआयडीला मिळतत नाहीय. याच्या मागे काय आहे तर मला कुठेतरी अशी शंका आहे. कृष्णा आंधळेला संतोष देशमुख यांची हत्या आणि धनंजय मुंडे यांच्यातली जी लिंक आहे, ती पूर्णपणे माहिती आहे. त्याच्याकडे अनेक प्रूप्स, अनेक व्हिडिओ आहेत. म्हणूनच तो आत्तापर्यंत एप्सपाँडिंग आहे. त्यातच आता तर असं कळतंय की तीन वेळा तो त्याच्या गावी येऊन राहून गेला तरी तो सीआयडीला भेटत नाहीय. खूप वाईट वाटतयं मला खूप घृणा आली आहे या महाराष्ट्राच्या राजकारणाची.
अंजली दमानिया

सामाजिक कार्यकर्त्या



कृष्णा आंधळे हा आरोपी जसं इतर आरोपींना पकडण्यात आलं तसा कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे. आणि हे यंत्रणेचं मोठं अपयशच आहे. की एक आरोपी ज्याचा संतोष देशमुख यांना मारण्यामध्ये सहभाग होता त्याला अत्तापर्यंत पोलिस अटक करु शकले नाहीत हे खरोखरंच धक्कादायक आहे. आणि म्हणून धनंजय देशमुख यांनी जी मागणी केली की, हा आरोपी त्याच्या गावाकडं तीनदा, चारदा येऊन गेला. सीआयडीलाही त्याने ही माहिती दिलीद आणि तरीसुद्धा हा फरारच आहे. आता मुख्यमंत्र्यांनीच यामध्ये लक्ष घालावं
आमदार प्रकाश सोळंके

माजलगाव विधानसभा क्षेत्र (बीड)

Comments


bottom of page