सत्याग्रहाने आम्ही जात असून आणि आमचे डोके फुटणार असतील... मंत्री भुजबळ
- Navnath Yewale
- Oct 7
- 2 min read
“कायदा हातात घ्यायला, अक्कल लागत नाही, ... तर आम्हाला पक्ष बाजूला ठेवून सांगावं लागेल.” असं म्हणत छगन भुजबळ यांनी जरांगेवर टीका करत सरकाला एक प्रकारे इशारा दिला आहे.

मुंबई: मराठा अरक्षणाच्या जीआर विरोधात आज मंत्री छगन भुजबळ पून्हा आक्रमक झाले. मराठा आक्षणसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. मनोज जरांगे पाटील हे वारंवार टीकेला उत्तर देत आहेत. मंत्री भुजबळ यांनी आज आझाद मैदान येथे मनोहर धोंडे यांच्या आंदोलनाला भेट देवून जरांगे पाटील यांच्यावर टीका केली.
मनोहर धोंडे यांच्या आंदोलनास आज मंत्री छगन भुजबळ यांनी भेट देवून उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, “मनोज जरांगे पाटलांचा अभ्यास किती? त्याचं शिक्षण काय? तो मराठ्यांचा नेता नाही” असं म्हणत भुजबळ यांनी हल्लाबोल केला.
मंत्री भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की, “राज्यात कुठेही ओबीसींवर अन्याय होत असेल तर आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि अन्यायाविरोधात लढलं पाहिजे. ओबीसींवर हल्ला झाला आणि पोलिसांनी कारवाई केली नाही तर पोलिस ठाण्यात जाऊन आंदोलन करा. तसेच कोणी मराठ्यांना आवाहन करत असेल की ओबीसींना मतदान करू नका तर आम्हालाही तसंच वागावं लागेल.”
“ ते जर म्हणत असतील की ओबीसी उमेदवारांना मतदान करू नका तर मग आपण काय सांगायचं? असं असेल तर आम्हालाही पक्ष बाजूला ठेवावे लागतील आणि एकीने लढावं लागेल. आतापर्यंत आम्ही आमच्या पक्षाचा सीमा ओलांडल्या नाहीत. कधी काही बोललो नाही. परंतु, अशा रितीने कोणी वागत असेल बोलत असेल तर ओबीसी नेत्यांना सुद्धा आपल्या समाजाला असाच आदेश द्यावा लागेल.”
जागे रहा! रात्र वैर्याची आहे ...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले, “ तुम्ही (मराठा समाज) 54 टक्के आहात, राज्यात सात टक्के आदिवासी आहेत, 13 टक्के दलित आहेत, असे सगळ मिळून तुम्ही 74 टक्के झालात. त्यात आता मुस्लिम समाजही तुमच्याबरोबर आहे. हे सगळं पहिल्यानंतर तुमची आकडेवारी कुठच्या कुठे गेली ते बघा.
त्यामुळे मला ओबीसींना एवढंच सांगायचं आहे की एकीने लढा. ही रात्र वैर्याची आहे सर्वांनी जागं राहयला पाहिजे, जागं राहून लढाई लढली पाहिजे, आपला उद्देश एकच आहे राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत जो शासन निर्णय जाहीर केला आहे तो रद्द करायला हवा.”



Comments