सरकारकडून शेतकर्यांना तात्पुरता आनंद देण्याचा प्रयत्न- जरांगे पाटील
- Navnath Yewale
- 3 days ago
- 2 min read
आता शेतकर्यांसाठी रस्त्यावरची लढाई; लवकरच राज्यस्तरावर बैठक, आंदोलनाचा इशारा

जालना: राज्यात परतिच्या पावसाने धुमाकूळ घातला,ढगफूटीसदृष्य, मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. महापुरामुळे लाखो हेक्टर शेती पिकांसह खरडून गेली. राज्यातील खासकरून मराठवाड्यातील हजारो हेक्टर शेती नामशेष झाली आहे. शेतकर्यांना आधार देण्यासाठी सरकारने पॅकेज जाहिर करत दिवाळी सनाला मदत जाहिर केली असली तरी सरकारकडून शेतकर्यांना तात्पुरता आनंद देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपकरत लवकरच शेतकर्यांसाठी रस्त्यावरच्या लढाईचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
दुष्काळाचा सामना करणार्या मराठवाड्यात यंदा परतिच्या पावसाने अक्षरश:धुमाकूळ घातला आहे. सप्टेंबरच्या शेवटी आणि ऑक्टोबरच्या सुरवातील राज्यभरात मुसळधार, ढगफूटीसद़ृष्य पासामुळे नदी नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. महापुराने आनेक जनावरांना जीव गमवावा लागला तर कित्तेक ठिकाणी मानवी हानी झाली.
नदी व नाल्या काठची जमिन पिकांसह खरडून गेली. मराठवाड्यात याची तिव्रता अधिक होती, पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने कित्तेक नागरिकांना एनडीआरएफ, स्थानिक प्रशासनाच्या मदतीने रेस्क्यू करण्यात आले. बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यातील हजारो नागरिकांना सुरक्षीत स्थळी स्थलांतरीत करण्यात आले होते. बीड व धाराशिव जिल्ह्यात हेलीकॉप्टरच्या साह्याने नागरिकांना रेस्क्यू करावे लागले.
ऐन काढणीच्या सुगीतच ढगफूटीसदृष्य पासाने कहर केल्याने हाता तोंडाशी आलेला खरिपा घास हिरावला. जीवापाड जपलेलं पिक डोळ्यादेखत पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी पुरता संकटात बुडाला. जगाच्या पोषिंद्यावर निसर्ग रुसल्याने अनेक सामाजीक संघटना मदतीसाठी पुढे आल्या. अवश्यकतेनुसार पुरग्रस्तांना किराणा, उबदार कपड्यांच्या किटांचे वाटप करण्यात आले.
संकटाशी दोन हात करणार्या शेतकर्यांना आधार देण्यासाठी सरकारने सरकसकट मदतीचे आवाहन केले. त्यानुसार केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने शेतकर्यांना कोरडवाहू, बागायती, खरडून गेलेली, नष्टझालेली शेती अशा स्वरुपात हेक्टरी मतद जाहिर केली. पण शेतकर्यांसाठी ही मदत तुटपुंजी असल्याने हेक्टरी किमान 50 हजार मदतीची मागणी शेतकरी संघटनांसह विरोधकांनी केली. मात्र, नुकसानीचे निकष ठरवून सरकारने शेतकर्यांना मदतीची घोषणा केली.
सरकाच्या घोषणे नुसार दिवाळीपूर्वीच पहिल्या टप्यातील मदत शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अश्वाशीत केले. त्यानुसार काल लक्ष्मीपुजनाच्या दिवशी शेतकर्यांच्या बँक खात्यावर पहिल्या टप्यातील मदत जमा झाली. मात्र ही मदत तात्पुरता आनंद देणारी असल्याचा आरोप करत सणाचे चार दिवस लोटल्या नंतर शेतकरी संघटना, अभ्यासक यांची राज्यस्तरावर बैठक घेवून लवकरच पुढील आंदोलनाची तारीख ठरवण्यात येणार असल्याचे मनोज जरांगे पाटील आज माध्यमांशी बोलताना म्हणाले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी श्री क्षेत्र नारायण गडावरील दशरामेळाव्यातून शेतकर्यांना भरीव मदतीचे आवाहन केले होते. संकटाने पिचलेल्या शेतकर्यांना सरकारने तात्काळ भरीव मदतीची आंमलबजावणी करावी अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला होता. त्या अणुषंगाने आज जरांगे पाटील यांनी सरकारच्या मदतीवर नाराजी व्यक्त करत लावकरच आंदोलनाची पुढील तारीख जाहीर करण्याचा इशारा दिला आहे.



Comments