top of page

सरकारच्या उपसमिती पुनर्गठणावर जरांगे पाटलांचा उपरोधक टोला.

नवीन काही नाही, पोळ्याच्या दिवशी खांदे बदल केली


ree

मराठा आंदोलक जरांगे पाटील 29 ऑगस्ट रोजीच्या मुंंबई आंदोलनावर ठाम आहेत. जरांगे पाटील यांना रोखण्यासाठी फडणवीस सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. मंत्रिमंडळाचीही धावा सुरूअसल्याचे आज उपसमिती पुनर्गठणावरून दिसून आले. जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळाची मराठा आरक्षण उपसमितीचे पुनर्गठण केले. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या जागी मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सरकारच्या या निर्णया नंतर प्रथमच जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यात नवीन काही नाही, पोळ्याच्या दिवशीच खांदे बदल केला. असा उपरोधक टोलाही जरांगे पाटील यांनी लगवला आहे.


सरकारच्या उपसमिती पुनर्गठणावर जरांगे पाटील म्हणाले की, आमचं म्हणणं काय आहे, ते सरकारच्या डोक्यात बसत नाही. उपसमिती गठीत केली म्हणजे नवीन काय आहे, ती समिती पहिलीच आहे. उपसमिती आणि आमच्या मागण्या वेगळा विषय आहे. पोळ्याच्या दिवशी केवळ खांदे बदल केली आहे. सकाळ दूपार नंतर नांगराचे खांदे बलणे असं.आमची मागणी मराठा- कुणबी एक आहेत ते आमचं आम्हाला द्या.


त्यासाठी बैठका लावा, हैदराबाद गॅझेट, सातारा संस्थानचं गॅझेट लावा त्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक बोलवा, एकदा त्याची मंजूरी द्या त्याची अंमलबजावणी करा यासाठी कॅबिनेट बोलवा, केसेस मागे घ्या, बलिदान दिलेल्यांचा विषय मार्गी लावा, तुम्ही सगेसोयरे या अधिसूचनेच्या आंमलबजावणीसाठी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक बोलावून त्याला मंजूरी द्या ते लागू करा हे काम करा. ही अशी दिशाभूल आणि मराठ्यांना वेड्यात काढायचं बंद करा. लोकांना कळतयं ही उपसमिती पहिलीच स्थापन आहे यात नविन काय त्यात

Comments


bottom of page