सातारा गॅझेटिअरचा जीआर काढा, अन्यथा तीव्र आंदोलन - जरांगे पाटील अजितदादांच्या अपघाताबाबत शंका असतील तर चौकशी झालीच पाहिजे; मराठ्यांनी सावध राहण्याची गरज

पंढरपूर: सरकारने वेळ न घालवता दिलेला शब्द पाळून सातारा, औंधसह विविध गॅझेटिअरचा जीआर काढावा, अन्यथा पुढील महिन्यापासून तीव्र आंदोलनासाठी जिल्हानिहाय बैठकांचा इशारा देत अजितदादांच्या अपघाताबाबत शंका असतील, तर चौकशीची मागणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येथे दिला.
मजनोज जरांगे पाटील काल दि.11 जानेवारी पासून सोलापूर जिल्हा दौर्यावर आहेत. शुक्रवारी दि.12 जानेवारी सकाळी पंढरपूर येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जरांगे पाटील म्हणाले की, मागील मंत्रिमंडळ बैठकीत सातारा गॅझेटिअरच्या बाबत निर्णय घेतला आहे. त्याचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याचे उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कळवले आहे. सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे लवकर सातारा, कोल्हापूर, औंधसह मिरज, बॉम्बे गव्हरमेंटचे गॅझेटिअर लागू करून तातडीने जीआर काढावा, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलनासाठी जिल्हानिहाय बैठकांचे सत्र सुरू होणार आहे. त्याची सुरूवात सोलापूर जिल्ह्यापासून होईल असंही जरांगे पाटील म्हणाले.
दरम्यान, अजितदादांच्या अपघाताबाबत शंका उपस्थितीत होत असल्याच्या प्रश्नावर जरांगे पाटील म्हणाले की, अजितदादांच्या अपघाताबाबत शंका असतील, तर चौकश्या झाल्याच पाहिजेत. मराठ्यांना यापूढील काळात हुशार व्हावे लागणार आहे. केवळ हुशार राहून चालणार नाही तर सावध राहनं काळाची गरज आहे. “ ते खून करून नाही केला म्हणतात” यांची हिंम्मत पहा.
मराठ्यांनी येणार्या काळात कोणी काही बोलला की संभ्रमात राहू नये, जो समाजासाठी काम करतोय तो मग तो कोणत्याही पक्षाचा का असेना त्याच्या पाठीशी ताकदीने उभं राहवं. समाज उभा राहिला तरच षडयंत्र रचणाराला आपण मोडून काढू. मराठ्यांनी येणार्या काळात सावध राहण्याचे आवाहनही जरांगे पाटील यांनी यावेळी केले.



Comments