top of page

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरुन मंत्री शंभूराज देसाई विधीमंडळात आक्रमक; आंतरवाली सराटीच्या लाठीचार्जचा उल्लेख पोलिस अधिक्षक तुषार दोशींचा टॅ्रक रेकॉर्ड काढण्याची मागणी

Mar 23
1 min read

मुंबई : सातारा जिल्हा पिरषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीमुळे संतपालेले शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधिमंडळात आपला राग व्यक्त केला. यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर आगपाखड केली. आम्हाला दहा-दहा पोलीस मिळून ओढत होते. कोणी आमच्या दंडाला, कोणी पायाला, कोणी कंबरेला पकडले होते. एखाद्या गुन्ह्यातील अरोपीला पकडतात तसे पोलीस मंत्र्यांना धरून खेचत होते. याप्रकरणी विधानपरिषदेच्या सभापतींनी पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. मात्र निवृत्ती न्यायाधीशांमार्फत या प्रकरणाची चौकशी करताना तुषार दोशींच्या या आधीच्या कारकीर्दीचीही चौकशी केली जावी, अशी मागणी शंभूराज देसाई यांनी केली.


तुषार दोशींबाबत बोलाताना अंतरवाली सराटीचा उल्लेख सभागृहात झाला. अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. एकनाथ शिंदेंनी दोनवेळेला मला तिकडे पाठवले होते, अंतरवाली सराटीत प्रचंड उद्रेक होता. त्यावेळी तुषार दोशींना तिथून का काढले. अंतरवाली सराटीत गोळीबार झाला, लाठीमार केला, त्यावेळी जालन्यातून तुषार दोशींना काढण्यात आले. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड काढा. वर्षभर सातार्‍यात काय चालले आहे? रेल्वे पोलीसमधील कुठला कर्मचारी इथे आणून बसवलाय, कोणते उद्योग करण्यासाठी बसवलाय, अशी टीका शंभूराज देसाई यांनी केली.


पोलिस अधीक्षक तुषार दोशींच्यवा सांगण्यावरुन पोलीस निरिक्षक देवकर, सहाय्यक निरिक्षक गर्जे आणि 100 साध्या वेषातील पोलिस या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. मकरंद पाटील आणि मी कोणत्या पोलिसांनी आम्हाला धरुन खेचले, हे चेहरे बघून सांगू शकतो, असेही शंभूराज देसाई यांनी म्हटले.


निलम गोर्‍हेंचे निर्देश : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये झालेल्या अभूतपूर्व राड्यानंतर विधान परिषद सभापती निलम गोर्‍हे यांनी गंभीर दखल घेतली. निलम गोर्‍हे यांनी सातारा पोलिस अधीक्षकांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणात पुण्याच्या विभागीय आयुक्तांना लक्ष घालून चौकशीचे ओदशही यावेळी त्यांनी दिले.

Comments


bottom of page