top of page

सुनेत्रा पवारांच्या जीवित्ताला चाकणकरांकडून धोका? बीडच्या व्यक्तीची एसआयटीकडे तक्रार

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांच्यातील पूर्वीचे गुरू शिष्याचे संबंध समोर आले होते. दिवंगत उपमुख्यमंत्री यांच्या अपघाती मृत्यू पूर्वी त्यांच्या घरासमोर जादू-टोण्याचा प्रकार आणि त्या नंतर खरातकडे अजितदादा पवार यांच्या फोटोवर फुल्ली या सर्व बाबी संशीयित असतानाच भोंदू बाबा अशोक खरात आणि व्हिएसआर कंपनीशी संबंध या सगळ्या बाबी संशयास्पद असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरचंद्र पवार) पक्षाकडून वारंवार बोलले जात आहे. यासर्व प्रकरणाची सखोल निष्पक्ष चौकशीची मागणीही करण्यात आली आहे.


सध्या अशोक खरात एसआयटीच्या पोलिस कस्टडीत आहे. महिलांच्या लैंगिक शोषणासह इतर गुन्हे दाखल असलेल्या खरातच्या तपासात आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका असल्याच्या तक्रारीची नोंद झाली आहे. एसआयटी या तक्रारीची सत्यता पडताळत असून, राजकीय वर्तुळात या घटनेने खळबळ उडाली आहे.


स्वयंघोषीत कॅप्टन, भोंदू अशोक खरात प्रकरणाचे धागेदोरे प्रचंड गुंतागुंतीचे असून त्याच्या अनेक कारनाम्यानी नागरिकच काय पोलिसही चांगलेच हादरले आहेत. अनेक महिलांचे लैंगिक शोषण, अत्याचार, फसवाफसवी, पैसे लुबाडणे अशी अनेक काळी कृत्य त्याने केली असून त्याच्याविरोधात 15 गुन्हे दाखल झाले आहेत. तुरूंगाच्या गजाआड असलेल्या खरातची एसआयटीकडून रोजच्या रोज चौकशी होत असते आणि त्यात नवनवी धक्कादायक माहितीदेखील उघड होत आहे.


राज्याच्या उपमुख्यमंत्री, सुनेता पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याची तक्रार करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील एका व्यक्तीकडून एसआयटी कडे तक्रार करण्यात आली आहे. ही तक्रार भोंदू खरात प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आला आहे. एसआयटी कडून या तक्रारीची पडताळणी होण्याची शक्यता आहे. कोणीतरी खोडसाळपणे ही तक्रार केल्याचां संशय असून सत्य काय ते शोधून काढण्यासाठी या तक्रारीतील तथ्य पडताळण्यासाठी एसआयटीकडून चौकशी करण्यात येणार आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव अशोक खरात प्रकरणात पुढे आले होते. अशोक खरात हा रुपाली चाकणकर यांचा गुरु होता. खरातसोबतचे चाकणकरांचे अनेक फोटोही व्हायरल झाले. एवढंच नाही तर खरातच्या ट्रस्ट च्या सदस्य होत्या अशी माहिती देखील उघड झाली होती. अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांचे काही फोटो आणि व्हििउओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यात त्या अशोक खरातची पाद्यपूजा करत असल्याचे दिसून आले.


दरम्यान, भोंदू अशोक खरात प्रकरणी ईडी कडून कारवाई करण्यात आली आहे. भोंदू अशोक खरातची तीन खाती ईडी कडून सील करण्यात आली आहेत. तसेच अशोक खरातची फरार असलेली पत्नी, कल्पना खरात हिचे बँक खाते देखील ईडीने सील केलं आहे. या बँक खात्यांमधील गेल्या तीन वर्षापासूनच्या व्यवहारांची ईडी कडून पडताळणी करण्यात आली. एसआयटी सोबतच ईडी कडून देखील भोंदू खरातभोवतीचा फास आवळला जाणार आहे.

Comments


bottom of page