स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात मराठवाड्याच्या राजकारणाला कलाटणी?
- Navnath Yewale
- 2 days ago
- 1 min read
जय भगवान महासंघाने ठोकला शड्डू; मुंडे बंधु-भगिणीं समोर आव्हाण!

राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होवू घातल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमिवर सरकारने महाराष्ट्रात हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं आहे. ओबीसी आणि मराठा समाज आमने- सामने आल्याचं चित्र आहे. याची सर्वाधिक तीव्रता मराठावड्यात दिसून येत आहे. नुकतीच बीडमध्ये ओबीसी नेत्याची महाएल्गार सभा पार पडली, त्यानंतर आरोप- प्रत्यारोप सुरू झाले, या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता मराठवाड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री धनंजय मुडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जय भगवान महासंंघही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर मराठवाड्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, अशातच जय भगवान महासंघ आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरणार आहे. मराठवाड्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्वच ठिकाणी जय भगवान महासंघ उमेदवार देणार आहे. जो कोणी ओबीसींचा विचार करेल असे नेते आमच्या सोबत राहील असं म्हणत बाळासाहेब सानप यांनी आता थेट धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना आव्हान दिले आहे.
दरम्यान निवडणुकीत मराठा बांधवांना देखील सोबत घेणार असल्याची माहिती बाळासाहेब सानप यांनी यावेळी दिली.या निवडणुकीच्या माध्यमातून कुठेतरी जातीवाद संपला पाहिजे, असेही बाळासाहेब सानप म्हणाले. निवडणुक जाहीर झाल्यानंतर आता मराठवाड्यातील किती जागांवर जय भगवान महासंघ आपले उमेदवार उभे करणार हे येणार्या काळात समोर येणार आहे. भगवान महासंघ निवडणुक रिंगणात उतरत असल्यामुळे मराठवाड्यातील ओबीसी नेत्यांनी आता हे एक प्रकारे आव्हानच मानले जात आहे. वंजारी समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा ही मागणी आम्ही निवडणुकीच्या काळात देखील लावून धरणार आहोत, आणि त्याच माध्यमातून आता येणारी निवडणुक आम्ही लढणार आहोत, असंही बाळासाहेब सानप म्हणाले.



Comments