स्वयंघोषित ज्योतिष खरातच्या पत्नीचा जवळच्यांनी षडयंत्र रचल्याचा आरोप,अशोक खरातचं एन्काउंटन होणार तारीखही सांगितली, तृत्पी देसाईच्या दाव्याने खळबळ
- Navnath Yewale
- 3 days ago
- 2 min read

नाशिक : स्वयंघोषित ज्योतिष आणि आध्यात्कि गुरू अशोक खरात याच्यावर शेकडो महिलांचा लैंगिक छळ तसंच अत्याच्यार प्रकरणी अटक झाली आहे. त्याच्याकडून 58 हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी जप्त केले आहेत. याच अशोक खरातची पत्नी कल्पना खरात यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये आपला पती कुठल्या प्रकारे तज्ज्ञ किंवा व्यवसायिक ज्योतिषी नव्हता, असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या पतीविरोधात केलेल्या कारवाईवरुन अनेक अरोपही केले आहेत.
कल्पना खरात म्हणाल्या की, “ माझे पती हे तज्ज्ञ अथवा व्यावसायिक ज्योतिषी नाहीत. त्यांच्या जवळच्या सकहार्यांनी त्यांचा घात केला असून समाजात असलेली त्यांची प्रतिमा उद्ध्वस्त करण्यासाठी हे कारस्थान रचलं गेलं आहे, ” असंही कल्पना खरात म्हणाल्या.
दरम्यान, अशोक खरात आणि त्यांची पत्नी कल्पना खरात हे दाम्पत्य स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू म्हणून समाजात वावरत होते. कारण गुरुपौर्णिमानिमित्त या दोघांच्याही पाद्यपुजन सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. त्याचबरोबर खरातनं जी काही माया आर्थात पैसा जमा केला आहे तो त्यांन आपल्या पत्नीसह दोन मुली आणि जावयाच्या नावे केल्याचंही समोर आलं आहे. कोट्यवधी रुपयांचे भूखंड, हार्डवेअरचं भलंमोठं शोरुम त्याचबरोबर आलिशान फार्महाऊस, विविध ठिकाणी केलेली गुंतवणूक अशी बरीच मोठी संपत्ती त्यांनं आपल्या नातेवाईकांच्या नावावर केली आहे.
अशोक खरात याला आध्यात्मिक गुरु मानलं असल्यानं त्याच्याशी संबंधित अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे फोटो समोर आले आहेत. त्याचबरोबर अशोक खरात अध्यक्ष असलेल्या शिवनिका संस्थान ट्रस्टच्या एक ट्रस्टी म्हणून देखील रुपाली चाकणकर कार्यरत होत्या. त्याचबरोबर 2022 मध्ये नाशिकच्या एका स्थानिक वर्तमानपत्रानं खरातच्या काळ्या कारनाम्यांबाबत बातमी दिल्यानं खरातची कथित बदनामी केल्याप्रकरणी त्या वर्तमानपत्राला कारणे दाखवा नोटीस पाठवून दबाव आणल्याा आरोपही रुपाली चाकणकर यांच्यावर झाला. यासर्व प्रकारामुळं अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले आणि त्यानंतर त्यांची राज्य महिला अयोगाच्या अध्यक्षपदावरुन गच्छंती झाली.
ढोंगी ‘कॅप्टन’अशोक खरातचं एनकांऊन्टर होणार?: खरातचे अनपेक बड्या मंत्र्यांशी आणि राजकारण्यांशी जवळचे संबंध असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, “ खरातकडे असलेल्या माहितीमुळे अनेक बड्या नेत्यांचे पितळ उघडे पडण्याची भीती आहे. त्यामुळे हे प्रकरण दडपण्यासाठी खरातचा काटा काढला जाऊ शकतो. अशोक खरातला 24 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 24 तारखेला त्याला न्यायालयात हजर करताना त्याचे एन्काउंटर घडवून आणले जाऊ शकते, असा दावा देसाई यांनी केला आहे. राजकीय नेत्यांची नावे समोर येऊ नयेत यासाठी हे संपूर्ण प्रकरण कायमचे बंद करण्याचा कट रचला जात असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.



Comments