top of page

स्वातंत्र्यदिनापासून टोल टॅक्सवर मोठी सूट!

3,000 रुपयांत वर्षभर पास; कमाल मर्यादा 200 फेर्‍या



ree

राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझावरून जाताना दरवेळी थांबणार्‍या आणि फास्टॅग रिचार्जची चिंता करणार्‍यांसाठी आता एक मोठी दिलासादायक बातमी आहे. 15 ऑगस्टपासून वार्षिक पास सुरू होणार आहे, ज्यामुळे खासगी कार मालक वर्षभर सहजपणे टोल प्लाझावरून जाऊ शकतील. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ही सुविधा विशेषत: राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती महामार्गांवर नियमितपणे प्रवास करणार्‍यांसाठी तयार केली आहे.


3,000 रुपयांच्या निश्चित किमतीच्या पासमाध्ये एक वर्षासाठी किंवा 200 फेर्‍यांपर्यंतची सुविधा असेल, यापैकी जे आधी पूर्ण होईल, त्याची वैधता तेथे संपले. सरकारचा असा विश्वास आहे की, ही योजना प्रवाशांचा वेळ वाचवेलच, शिवाय टोल प्लाझावरील गर्दी की करण्यासही मतद करेेल. त्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या वेबसाईटकवर आणि ‘ राजमार्गयात्रा’ अ‍ॅपवर उपलब्ध आहे.


केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही योजना जाहिर केली आहे. पासची किंमत 3,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे तो एनएचएआय पोर्टल किंवा‘ राजमार्गयात्रा’ मोबईल अ‍ॅपद्वारे सक्रिय करात येतो. हा पास एका वर्षासाठी वैध असेल. परंतु त्याची कमाल मर्यादा 200 फेर्‍यांची असेल. यापैकी कोणताही पास आधी पूर्ण झाला की, तो पास कालबाह्य मानला जाणार आहे. ही सुविधा फक्त ‘वाहन’ डेटाबेसमध्ये नोंदणीकृत असलेल्या खासगी वाहनांनाच उपलब्ध असेल. हा पास ज्या वाहनावर नोंदणीकृत आहे, त्यावरच काम करेल. इतर कोणत्याही वाहनावर वापरण्याचा प्रयत्न केल्यास तो आपोआप निष्क्रिय होणार आहे.

Comments


bottom of page