top of page

हॉस्पीटलमधून डिस्चार्ज मिळताच जरांगे पाटलांचा मोठा निर्णय

पत्रकर परिषदेतून विरोधकांवर हल्लाबोल, तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ

आंतरवालीमध्ये जेसीबीने गुलालाची उधळन, नारायगडावर साधला समाजबांधवांशी संवाद


ree

जालना/बीड: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आठवडाभराच्या उपचारानंतर आज छत्रपती संभाजी नगरच्या गॅलेक्सी हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. सकाळी 10:00 वाजता जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेतून माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. आंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत करतण्यात आले. ग्रामस्थांनी जेसीबीवरून गुलालाची उधळन करत जरांगे पाटील यांच्या समर्थनामध्ये घोषणाबाजी केली. ग्रामदैवतांच्या दर्शनानंतर जरांगे पाटील धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातील नारायण गडावर मार्गस्थ झाले. दर्शनानंतर त्यांनी समाज बांधवांशी संवाद साधला.

मनोज जरांगे यांच्या मुंबई येथील उपोषणा दरम्यान सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजास ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा असा मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याचाव जीआर काढला. त्यानुसार मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असला तरी दुसरीकडे ओबीसी नेते सकाराच्या जीआर विरोधात आक्रमक झाले आहेत. त्यामुळ—े राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी अशा नव्या वादला तोंड फुटत आहे.


मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण विरोधात कोर्टात जाण्याची घोषणा असो वा विदर्भातील नेत्यांची पुढील आंदोलनाची रननिती किंवा मराठवाड्यामध्ये नवनाथ वाघमारे, लक्ष्मण हाके, मंगेश ससाने यांचे दौरे असो हे सर्व ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात मोट बांधणी सुरू केली आहे. बीड जिल्ह्यात काल, परवा बीड जिल्ह्यातील भोगलवाडी, गेवराई, मांजसुंबा फाटा येथे दोन्ही गटांकडून राडा झाल्याचे पहावयास मिळाले.


भोगलवाडी येथे ओबीसी नेत्यांनी असंविधानिक भाषेत जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजावर टीका केल्याने सोशल मिडियावरून संताप व्यक्त केला जात आहे. यावर जरांगे पाटील यांनी समाजास संयम राखण्याचे आवाहन केले आहे. आपण आपला उद्देश साध्य करण्याच्या मागे ताकद लावा, येत्या 17 सप्टेंबर पर्यंत सरकारने जीआर ची आंमलबजावणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

पत्रकार परिषदे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, सरकारने आम्हाला हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर काढला आहे. सरकारने आता चालढकल करायची नाही मराठवाडामुक्ती संग्राम दिनी जीआर नुसार प्रमाणपत्र वाटप करायचे. मला खात्री आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आता मराठ्यांची फसवणूक होईल असे कोणतंही काम करणार नाहीत.


मंत्री छगन भुजबळ यांच्या कोर्टात जाण्याच्या भूमिकेवर जरांगे पाटील म्हणाले की, सरकारने आता आम्हाला आंमलबजावणीच द्यायची त्या येवल्यावाल्याच्या सांगण्यावरून जीआर मधे एखाद्या शब्दाची ची अफरातफर केली तर मैदान सज्ज आहे. तुम्ही आमच्या लेकरा बाळाच्या मुळावर उठत असाल तर आम्ही तुमच्या मुळावर उठणार आता. सन 1994 च्या जीआरला मी स्वत: कोर्टात चॅलेंज करुन तो रद्द करून दाखवतो. पण आम्हाला असं काही करायचं नाही. सरकाने त्याला समाजावून सांगावं.


तुम्ही जर आमच्या लेकरांना असं विष पाजणार असाल तर आम्हीही तुम्हाला खेटणार आहोत. मंडल आयोगाने तुम्हाला 14 टक्केच आरक्षण दिलेलं आहे. त्यानंतर 1994 च्या जीआर नुसार 16 टक्के आरक्षण आमचं खाताय. शिवाय 50 टक्यांच्या वर जे 2 टक्के आरक्षण दिलेलं आहे ते सुद्धा 1994 च्या जीआरच्या बारोबर 2 टक्केही रद्द करू. तुम्ही जर आमच्या नोंदी असताना आरक्षणा देत नसला तर आम्हीच पूर्वीपासून ओबीसीमध्ये आहोत हे पुराव्यानिशी सिद्ध झालं आहे. आमचं असून तुम्ही आम्हाला खाऊ देत नसाल तर तुम्हालाही आता जशास तसे खेटणार आहोत. असा इशाराही त्यांनी दिला.


नोंदीनुसार आम्ही ओबीसीमध्ये आहोत, मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रमाणपत्र वाटप करावेत गॅझेटनुसार सरकार मराठ्यांना फसवतंय असा मॅसेज जाऊ देणार नाहीत याची खात्री आहे. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


हाके यांनी काल गेवराईमध्ये दंऊ थोपाटत ‘आता मतंमागायला आमच्याकडे आले तर दांडके आहेत’ असे वक्तव्य केले होते. त्यावर जरांगे पाटील यांनी नाव नघेता आमच्याही उशा पायथ्याला दांडके असतात आम्हाला दांडके कुर्‍हाडीची भाषा करायची नाही असा इशाराही त्यांनी असंविधानीक भाषेत टीका करणार्‍या ओबीसींच्या नेत्यांना दिला.


नवनाथ वाघमारेंचा निषेध

भोगलवाडी (ता. धारुर) येथील ओबीसी सभेत लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी जमलेल्यांना संबोधीत करताना ‘ मुंबईला जाऊन राज्याला वेठीस धरले, जिकडे तिकडे घाण केली. हे मराठे असु शकत नाही हे तर निजामाच्या आवलादी. या निजामाच्या पैदासींना आरक्षणात येण्यापासून रोखायचंय’ असं वक्तव्य केल्याने सोशल मिडियावर नवनाथ वाघामरे प्रचंड ट्रोल झाले. याशिवाय त्यांनी समाजाची माफी मागावी अशी मागणीही करण्यात येत आहे.

Comments


bottom of page