हगवणे कुटुंबीयांकडून थोरल्या सुनेचाही छळ; महिला आयोगाकडील तक्रारीवरुन स्पष्ट

वैष्णवी हगवणे यांना आत्हत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी अटकेत असलेले राजेंद्र हगवणे आणि कुटुंबाने थोरली सून मयूरी जगताप-हगवणे यांनाही मोटार आणि पैशांसाठी मारहाण केल्याचा आरोप आहे. राजकीय पाठिंब्याचा आणि मेव्हणा पोलिस अधिकारी असल्याचा धाक दाखवून गैरवर्तन करून अपंग भाऊ आणि आईला जीवे मारण्याची धमकी दिली, असे राज्य महिला आयोगाकडे दिलेल्या तक्रारीवरून उघडकीस आले आहे.
मयुरी यांची आई लता आणि भाऊ मेघराज जगताप यांनी 6 नोव्हेंबर 2024 रोजी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली होती. मयुरी यांचे 20 मे 2022 रोजी सुशील राजेंद्र हगवणे याच्याशी लग्न झाले. लग्नाच्या काही दिवसांनंतर सासरे राजेंद्र हगवणे यांनी मोटार, पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. त्यावरुन ते त्रास देऊ लागले. राजेंद्र, सासू लता, दिर शशांक, नणंद करष्मिा हे मयूरी यांना मारहाण करत. भावाला आणि आईला मारून टाकू, अशी धमकी देत,असे या तक्रारीत म्हटले आहे.
वाद झाल्यानंतर सामंजस्यातून तो मिटवला जात होता. 18 फब्रूवारी 2024 रोजी पौड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, पोलिस अधिकार्यांनी समज देऊन मध्यस्थी केली. सासू, सासरे मयूरी यांना सोडण्याची तिच्या पतीकडे मागणी करीत होते. त्याचा राग मयूरीवर काढला जात होता. 6 नोव्हेंबर 2024 रोजी पती घरात नसताना सासू, सासरा , दिर, नणंद यांनी मयूरी यांना मारहाण केली. सासरा आणि दिराने त्यांच्याशी गैरवर्तन केले. मुलगा होत नसल्याचे म्हणत शिवीगाळ केली. मयूरी मोबाईलमध्ये चित्रीकरण करी असल्याचे लक्षात येताच दिर शशांकने मोबाईल हिसकावून पळ काढला. मयूरी यांनी त्याचा पाठलाग केला. हा सर्व प्रकार सीसीटिव्ही कॅमेर्यात चित्रित झाला आहे. पोलिसांत तक्रार दाखल करू शकत नसल्याचा फायदा घेऊन सासू नणंदेने मयूरी यांच्याय विरोधात पोलिसांत तक्रार दिली. असे राज्य महिला आयोगाकडे दिलेल्या तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे.
एकाच दिवशी परस्परविरोधी तक्रारी: आमच्याकडे एकाच दिवशी दोन तक्रारी ई-मेलद्वारे दाखल झाल्या. सुरुवातीला 6 नोव्हेंबर 2024 रोजी मयूरी यांचे बंधू मेघराज जगताप यांनी तक्रार केली. त्यानंतर रात्री 12 वाजता मयूरी यांची नणंद करिष्मा हगवणे हिची मेलवरुन तक्रार आली. एकाच दिवशी दोन तक्रारी आल्यानंतर बावधन पोलिसांकडे या तक्रारी पाठवल्या आणि कारवाईच्या सूचना दिल्या. एकाच कुटुंबाजी वादातून परस्परविरोधी तक्रारी आल्या होत्या. कौटुंबिक वाद पोलिसांच्या भरोसा सेलमध्ये समुपदेशनाद्वारे मिटविण्यात यावा, यासाठी प्रयत्न कर्यात आले. नियमानुसार तीन वेळा समुपदेशन करणे गरजेचे असते. त्यानुसार प्रक्रिया पार पाडण्यात आली. या प्रकरणात लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.



Comments