top of page

हनीट्रॅप व्हाया मालमत्ता, मृत्यू; खडसे, महाजन वाद चिखघळला

बंगला, ट्रायडन हॉटेल आणि प्रफुल्ल लोढा, खडसेंचे महाजनांवर गंभिर आरोप


ree

हनीट्रॅप प्रकरणावरून राज्याच्या राजकारणासह प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील काही मंत्री आमदार या जाळ्यात आडकल्याचे विरोधकांकडून आरोप करण्यात येत आहेत. तर दूसरीकडे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही हनीट्रॅपचे शिकार झाल्याचे समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात हनीट्रॅप प्रकरणी चौकशीचे आदेश दिली असले तरी जळगावचं राजकारण चांगलच तापलं आहे. खडसे महाजन वादाला हनीट्रॅपचं बळ मिळाल्याने महाजन खडेसमध्ये आरोपांच्या फैरी झडत आहेत.


भाजप पदाधिकारी प्रफुल्ल लोढा यास महिला अत्याचार प्रकरणी 5 जूलै रोजी अटक करण्यात आलं. मंत्री गिरिष महाजनांच्या जवळचा कार्यकर्ता असलेल्या प्रफुल्ल लोढावर मुंबईमध्ये दोन तर पुण्यात एक असे महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, पोलिसांच्या अटकेत असलेल्या प्रफुल्ल लोढा याने सोशल मिडीयावरून एक बटन दाबलं तर हिदुस्तान हादरेल असा धमकी वजा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.


जळगावमध्ये खडसे महाजन वाद नवा नाही त्यामुळे या प्रकरणात आता खडसे यांनी उडी घेत प्रकरणाची एसआयटी, सीआयडी सह केंद्रीय तपास यंत्रेणेमार्फत चौकशीची मागणी केली आहे. शिवाय या प्रकरणात गिरिष महाजन असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. असं काय झालं की, प्रफुल्ल लोढा आणि गिरिष महाजन यांच्यातलं हाडवैर संपून एकदम मैत्रीत रुपांतरीत झालं.



गिरिष महाजन यांच्या अगदी जवळचा असलेला प्रफुल्ल लोढा याच्यापासून शासनाला धोका असल्याने त्याच्याकडील माहिती समोर येवू नये याची खबरदारी घेतली जात असल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला आहे. भाजपचे मंत्री गिरिष महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर पलटवार करताना खडसे यांच्या प्रॉपर्टीसह त्यांच्या मुलाच्या मृत्यू बाबतही संशय व्यक्त करत केला होता.


त्यावर एकनाथ खडसे यांनी माझ्या प्रॉपर्टीचे पाच वेळा चौकशी झाली आहे. इडी, सीबीआय, वगैरे यंत्रणेकडून, तर माझ्या मुलाच्या मृत्यू बाबत काही संशय असेल तर सरकार तुमचं आहे, केंद्रातलं सरकारही तुमचं आहे. काय चौकशी करायची ते करा, माझा मुलगा गेलाय, हे दुख: साठवून आहे. तुमच्यात हिंमत असेल तर कोणत्याही यंत्रणेकडून मृत्यूची चौकशी लावा. हनीट्रॅप वरुन मुद्दा भरकटावयाचा म्हणून असले प्रॉपर्टी, मुलाचा मृत्यू असे मुद्दे पुढे करायचे ते चालणार नाही, प्रफुल्ल लोढा स्वत: म्हणतोय एक बटन दाबलं तर हिंदूस्तान हादरणार! त्याच्या या वाक्यात काहीतरी दडलेलं आहे. ते बाहेर येऊ नये म्हणून महाजन कामाला लागलेत असा आरोपही खडसे यांनी केला.


त्यावर आज मंत्री गिरिष महाजन यांनी एकनाथ खडसेंचा एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. ज्यामध्ये प्रफुल्ल लोढा बाडीत बसेलेल्या एकनाथ खडसे यांना गुलाबाचं फुल देत आहे. यावरून या गुलाबी गप्पांचा अर्थ काय घ्यायचा असा टोलाही मंत्री गिरिष महाजनांनी एकनाथ खडसे यांना लगवला आहे. हनी ट्रॅप व्हाय प्रॉपर्टी, मृत्यू असा सुरू झालेला प्रवास कुठे थांबतोय हे येणार्‍या काळात पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


Comments


bottom of page