हर घर तिरंगा" अभियानांतर्गत हळदपाडा येथे महिलांचे एकत्रीकरण
- Navnath Yewale
- Aug 12
- 1 min read

तलासरी : भारतीय जनता पक्षाच्या "हर घर तिरंगा" या अभियानाच्या अनुषंगाने डहाणू पूर्व मंडळाच्या वतीने हळदपाडा येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष वसंत गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात हळदपाडा गावातील महिलांचे एकत्रीकरण करण्यात आले.
या प्रसंगी महिलांना विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. तलासरी तालुक्याचे अध्यक्ष विवेक करमोडा यांनी "हर घर तिरंगा" या अभियानाचा हेतू स्पष्ट करताना सांगितले की, "देशभक्ती हा संस्कार आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये रुजला पाहिजे ही आपली नैतिक जबाबदारी आहे." त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले की,

या अभियानाविषयी प्रत्येक नागरिकाला जागृत करावे व प्रत्येक घरात तिरंगा पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा.
"हर घर तिरंगा" अभियान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "आजादी का अमृत महोत्सव" या उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. या अंतर्गत नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकविण्यास प्रोत्साहित केले जाते, ज्यातून देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातील बलिदानांचे स्मरण व राष्ट्राभिमानाची जाणीव अधिक दृढ केली जाते.
Comments