top of page

हेल्मेट सक्तीसाठी वाहतुकशाखेने कंबर कसलीपोलीस अधीक्षक नवनित कॉवत यांचे सक्त आदेश; कोणाचीही गय नाही

बीड: जिल्हा वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, उद्यापासून विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये दंडात्मक कारवाईसह आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल.


जिल्हा वाहतूक शाखा, बीड यांचा महत्त्वपूर्ण उपक्रम : विद्यार्थ्यांना हेल्मेट वापराचे मार्गदर्शन, उद्यापासून कारवाई सुरू

रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी टाळण्यासाठी आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा वाहतूक शाखा, बीड यांच्या वतीने बीड शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना हेल्मेट वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या वेळी विद्यार्थ्यांना हेल्मेट न वापरल्यास होणारे गंभीर परिणाम, अपघाताच्या वेळी डोक्याला होणाऱ्या जखमा तसेच योग्य दर्जाचे हेल्मेट वापरण्याचे फायदे समजावून सांगण्यात आले. “हेल्मेट हे केवळ कायद्याची अट नसून जीवनरक्षक कवच आहे,” असे सांगत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.


सर्व दुचाकीस्वारांनी स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहन चालवताना अनिवार्यपणे हेल्मेटचा वापर करावा, तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

सदर मार्गदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर व जिल्हा वाहतूक शाखेचे अंमलदार यांनी केले आहे.

Comments


bottom of page