माझ्या अगोदर त्यांच्याकडे क्लिप वाजली, त्यांचीही चौकशी का होवू नये? - जरांगे पाटील

माझ्या अगोदर त्यांच्याकडे क्लिप वाजली, त्यांचीही चौकशी का होवू नये? - जरांगे पाटील
Published By: Navnath Yeole
Published On:

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणार्‍या 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराच्या ऑडिओ प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन प्रकरणाशी संबंधित पुरावे ताब्यात घेतले आहेत. या भेटीनंतर जरांगे यांनी आपल्याला आणि रामदार कदम यांना औडिओ क्लिप देणारी व्यक्ती एकच असल्याची दाट शक्यता असल्याचा दावा केला. तसेच या प्रकरणात रामदास कदम यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. 

जरांगे पाटील यांच्या विधानावर शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी सुरू असून, त्यांनी ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्यावर 500 कोटी रुपयांचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, असं रामदास कदम म्हणाले. 

जरांगे पाटील, तुम्ही माझ्याकडे कशाल बोट दाखवता आहात? तुमची पत्रकार परिषद होण्याच्या एक तास आधीच ती ऑडिओ क्लिप वाजली होती. तुमच्या बीडमध्येच ती क्लिप वाजवण्यात आली होती. माझ्याकडे ती वाजवण्यात आलेली नव्हती. दुसर्‍या दिवशी ती क्लिप मला मिळाली. आधी या गोष्टीची माहिती घ्या. आता याबाबत एसआयटी चौकशी करेल, असंही रामदास कदम यांनी स्पष्ट केलं.

ती ऑडिओ क्लिप कोणी वाजवली आणि त्याचा जरांगे यांच्याशी काय संबंध आहे, हेही लवकरच समोर येईल एसआयटीच्या चौकशीतून याचा उलगडा होईल. या प्रकरणाशी आपला कहीही संबंध नसल्याचा दावाही कदम यांनी केला. दुसर्‍या दिवशी क्लिप आपल्याकडे आल्यानंतर आपण ती वाजवली आणि तिची वेळ सांगितली, असंही कदम यांनी नमूद केलं.

रामदास कदम पुढे बोलताना म्हणाले की, ‘ जरांगे पाटील, तुम्ही इतके घाबरला आहात की थेट माझ्याकडेच बोट दाखवत आहात. आधी अभ्यास करा, माहिती घ्या आणि मग समोरच्या व्यक्तीचे नाव घ्या, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. पाटील यांनी आपल्या आजूबाजूला कोण आहेत, त्यांना ऑडिओ क्लिप कोणी दिली आणि पत्रकार परिषद होण्यापूवीृ बीडमध्ये ती क्लिप कोणी वाजवली. याचा शोध घ्यावा. असे आवाहन रामदास कदम यांनी केले. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून ते एसआयटी चौकशीत स्पष्ट होईल असा दवाही रामदास कदम यांनी केला. 

रामदास कदम यांनी जरांग  पाटील यांना माहिती घेवून बोलण्याचा सल्ला देत, खोटं बोल पण, रेटून बोल, असं होता कामा नये,. या विषयावर आपल्याला अधिक बोलायचे नव्हते, मात्र आता बोलण्यासारखे खूप काही आहे आणि ‘ खूप मसला आहे’ असं सूचक विधानही त्यांनी केले. पण सध्या या विषयाव आणखी कही बोलायचे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल. 

ऑडिओ क्लिपच्या स्त्रोताबाबत बोलतान मनोज जरांगे यांनी रामदास कदम यांचे नाव घेतले होते. ‘माझ्या अगोदर रामदास कदम यांनी ती क्लिप वाजवली होती. मला क्लिप देणारा माणुस आणि त्यांना क्लिप देणारा माणुस एकच असण्याची दाट शक्यता आहे. मग त्यांची चौकशी का होवू नये? त्यांनपा क्लिप कोणी दिली? असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला होता. जरांग ेयांच्या या मागणीनंतर आता एसआयटी रामदास कदम यांचीही चौकशी करणार का? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.   

Related Posts