top of page

अल्ववयीन मुलीवर दोन नराधमांचा अत्याचार; पीडितेचा विषारी औषध प्राशान करून आत्महत्येचा प्रयत्न

बीड: जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. अत्याचारानंतर पीडित अल्वयीन मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून पीडित अल्पवयीन मुलीवर छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती चिंताजनक असल्याची महिती डॉक्टरांनी दिली असून अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, दोन आरोपींनी अल्पवयीन मुलीवर बळजबरी अत्याचार केला. या अमानुष प्रकारामुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर पीडितेच्या आई-वडिलांनी तातडीने केज ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांंनी या प्रकारणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित गुन्हादाखल केला आहे. फिर्यादीच्या आधारे दोन आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यापैकी एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर दुसर्‍या फरार आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.


या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी बीड येथील पिंक पथकाला पाचारण करण्यात आले असून त्यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. आरोपींना कठोर शिक्षेची मागणी करण्यात येत आहे. घडलेल्या घटनेवरून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने या प्रकरणात तत्काळ आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.

Comments


bottom of page