खासदार सुप्रिया दिल्लीच्या जंतरमंतरवर सोनम वांगचुक यांच्या भेटीला
- Navnath Yewale
- Jul 17
- 2 min read
संसदेत आवाज उठवण्याची ग्वाही, उपोषण मागे घेण्याची विनंती

नवी दिल्ली:दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 20 वा दिवस आहे. सोनम वांगचुक यांचे 9 किलो वजन घटले असून प्रकृती अत्यंत खालवली आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या वतिने सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनास देशभरातून सिने कलाकार, सामाजिक कार्यकर्त्यांसह विरोधीपक्ष, संघटनांचा पाठिबा वाढत आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर करत देशभरातील विरोधी पक्षांना आवाहन केले होते. आमआदमी पार्टीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर, समाजवादी पार्टीच्या डिम्पल यादव यांनी ओदोलनास भेट देत पाठिंबा जहीर केला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलना भेट देवून सोनम वांगचुक यांची विचारपूस करत आंदोलनास पाठींबा जाहीर केला.
खासदार सुप्रिया सुळे यासंनी दिल्लीत जंतरमंतर मैदानावर जाऊन सोनम वांगचुक यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत आपण याबाबत मुद्दा मांडण्याची ग्वाही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली.
दिल्लीतील जंतरमंतरवर सामाजिककार्यकर्ते सोनम वांगचुक कॉक्रोज जनता पार्टीच्या वतिने सुरू असलेल्या आंदोलनामध्ये गेल्या वीस दिवसांपासून उपोषण करत आहेत. सोनम वांगचुक यांचे 9 किलो वजन घटले असून त्यांची प्रकृती खालावली आहे. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला सनेसृष्टीतील कलाकारांसह विरोधीपक्ष, संघटनांनी पाठींबा दिला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज जंतरमंतरवील आंदोलनास भेट दिली. सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सुप्रिया सुळे जंतरमंतर मैदानावर गेल्या. त्यांनी सोनम वांगचुक यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी तरुणांना संबोधित केलं. सोनम वांगचुक यांची विचारपूस केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा मुद्दा आपण हिवाळी अधिवेशाना मांडू, तसेच हिवाळी अधिवेशनापूर्वी दोन ठिकाणी मांडू अशी ग्वाही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
खासदार सुळे म्हणाल्या, “ राज्यात आंदोलन चाललं असेल तर ती आमची नैतिक जबाबदारी आहे की, समाजात ज्या गोष्टी सुरू आहेत त्या सरकार दरबारी पोहोचवल्या पाहिजेत. समाजातील पालकांमध्ये, तरुण पिढीत एक भावना आहे, इथे आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी आंदोलन चालू आहे. आम्ही जे लोकप्रतिनिधी आहोत, आमची नैतिक जबाबदारी असते की, समाजात ज्या गोष्टी झाल्या आहेत त्या संसदेत मांडल्याच पाहिजेत” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“ संसद सुरू होण्याआधि दोन ठिकाणी मी या विषयावर बोलणार आहे. एकतर रविवारी सकाळी सर्वपक्षीय बैठकीत बोलाणार आहे. केंद्र सरकारने ही रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत मी शेतकर्यांच्या आत्महत्येचा विषय, भारतात कमी झालेला पाऊस, त्याचबरोबर शिक्षणात झालेला सावळा गोंधळ, राम मंदिराचे जे व्हिडीओज येत ओहत, असे अनेक गंभीर विषय देशासमोर आहेत. सर्वपक्षीय बैठकीत हे सर्व विषय आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीसोबत बोलून मांडणार आहोत” असंही खासदार सुळे म्हणाल्या.
सोमवारी सकाळी 10 वाजता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मी इथल्या भावना आणि इथल्या तरुणांमध्ये अस्वस्थता याबाबत बोलणार आहे.” अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.
एनडीएमध्ये सहभागी होणार?: सुप्रिया सुळे यांना योवळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार का? या प्रश्नावर त्यांनी “ याबाबत मला तरी कल्पना नाही. ना एनडीएने मला फोन केला आणि ना मी एनडीएला फोन केला.” असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान आमदार जयंत पाटील, एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर ही त्यांनी भाष्य केले, त्या म्हणाल्या “ हे बघा आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आमचे मायबाप महाराष्ट्राची आणि देशाची जनता आहे. त्यांची काम करण्यासाठी आम्ही निवडून येतो. त्यामुळे अनेक वेळा प्रत्येक मंत्र्यांकडे आम्हाला जावं लागतं. त्यामुळे आम्ही जातो. आम्ही फोटो काढतो. आम्ही ट्विट करतो. आम्ही ट्विट केले नसते तर तुम्हाला कळले असते का आमची भेट झाली?” असा सवाल त्यांनी केला.



Comments