जंतर-मंतरवरील आंदोलनाचा सिजन- 2 लवकरच - अभिजीत दिपके
- Navnath Yewale
- Aug 12
- 1 min read

नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) प्रमुख अभितीत दिपके, दिल्ली येथे आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी हॉल मिळण्यावरून भाजपवर आरोप केला आहे. बैठक रोखण्यासाठी राजकीय दबाव आणला जात असल्याचा अरोप करत “ लोक इन्स्टाग्रामवर सातत्याने विचारत आहेत की, जंतर-मंतरवर सीजन-2 ’ केव्हा येणार आहे. तर त्यांना सांगू इच्छितो की, जंतर- मंतरचा सीजन -2 लवकरच सुरू होत आहे” अशी घोषणा यावेळी दिपकेंनी केली.
दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की, “ आज दिल्लीत आमची कार्यकर्त्यांची बैठक होणार होती. त्यासाठी आम्ही हॉल शोधत होतो. मात्र, वरून दबाव असल्याचे कारण सांगत कोणीही हॉल भाड्याने देण्यास तयार नव्हते. मात्र, नंतर एक हॉल मिळाला. त्याची पावतीही मिळवली.पण मंगळवारी सकाळी हॉलच्या मालकांना, सीजेपीची बैठक होऊ दिल्यास उलटे लटकवण्यात येईल. अशी धमकी देण्यात आली असा अरोप दिपकेंनी केला आहे.
भाजप देशातील तरुणांपासून भयभीत: दिपके पुढे म्हणले, अशा प्रकारच्याव कारवायांवरून सत्ताधारी भाजप देशातील तरुणांच्या वाढत्या शक्तीमुळे भयभीत झाल्याचे दिसत आहे. मात्र, अशा दबावाला घाबरून आम्ही आंदोलन थांबवणार नाही. असे म्हणत दिपकेंनी जंतर- मंतरवरील आंदोलनाच्या दुसर्या टप्प्याची तयारी सुरू असल्याचे संकेत दिले आहेत.



Comments