जयपूरमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात राडा! संस्थापक अभिजीत दीपकेंना मारहाण; पार्टीच्या सदस्यांकडून चापट मारणार्या तरुणांना बेदम चोप
- Navnath Yewale
- 2 days ago
- 2 min read

जयपूर : जयपूरमध्ये कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांना दोन तरुणांनी कानशिलात लगावली. त्यानंतर पक्षाच्या समर्थकांनी त्या दोघांना पकडून बेदम चोप दिला. अभिजीत दीपके नीट पेपरफुटी, शिक्षण व्यवस्था बेरोजगारी आणि तरुणांशी संबंधित इतर समस्यसांविरुद्धच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते. अभिजीत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आंदोलक शहीद स्मारकारवर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. आंदोलनादरम्यान घोषणाबाजीवरुन काही तरुणांमध्ये वाद झाला. पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. आंदोलनस्थळी अनेक आंदोलकांचे मोबाईल फोनही चोरीला गेले. यानंतर व्यासपीठावरुन आपले मोबईल फोन आणि सामान सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करण्यत आले.
आंदोलनात सहभागी झालेले तरुण ‘मी माझ्या देशावर प्रेम करतो, मी भ्रष्टाचार नाकारतो आणि ‘ पेपरफुटी थांबवा’ यांसारख्या घोेषणा असलेले फलक आणि तिरंगा घेऊन आले होते. काही महिला आपल्या लहान मुलांसोबत आंदोलनात सामील झाल्या. कार्यकर्त्यांनी शहीद स्मारकाच्या प्रवेशद्वारावर कॉकरोच चे चित्र काढले आणि “ धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या” अशी घोषणा लिहिली होती. ज्या जरुणाने थप्पड मारली तो म्हणाला. “ हे लोक जिहादी मानसिकतेचे आहेत. मी जयपूरचा आहे. मी एक राष्ट्रवादी आहे. हा अभिजीत दीपके विनाकारण देशाची दिशाभूल करत आहे. ही पेपरफुटी केवळ एक निमित्त आहे.
सीजीपीचे संस्थापक अभिजीत दीपके शहीद स्मारकाजवळ पोहोचताच तरुणांमध्ये झटापट झाली. दीपके यांना खांद्यावर उचलून आत नेले जात होते. यावेळी जमावातील दोन तरुणांनी त्यांना थप्पड मारली. सीजेपीच्या सदस्यांनीही त्या तरुणाला चांगलाच चोप दिला. कानशिलात मारणार्यांना पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर अभिजीत दीपके यांनी आंदोलकांना संबोधित केले. त्यांनी घोषणा दिली, हिंदु- मुस्लिम राजकारण चालणार नाही, चालणार नाही. आपण हे स्वातंत्र्य बलिदानानंतर मिळवले आहे. आपण हिंदू आणि मुस्लिमांमध्ये विभागलेेले आहोत. आपण जात आणि धर्माने विभागलेले आहोत, पण आपण यात अडकून पडता कामा नये, आम्ही 20 जून रेाजी पुन्हा दिल्लीवर मोर्चा काढू. यावेळी जेव्हा आम्ही दिल्लीला जाऊ, तेव्हा राजीनामा दिल्याशिवाय परत येणार नाही. यावेळी त्यांनी “ दिल्ली चलो” चा ही नारा दिला. राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता झाली.



Comments