top of page

दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक, पाच मुद्यांवर एकमत

नवीदिल्ली: इंडिया आघाडीची नवीदिल्लीत सोमवारी (दि.8) महत्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीस देशभरातील 25 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. बैठकीत देशातील विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. महागाई, बेरोजगारी आणि घाटेळ्यांसह एसआयआर, नीट पेपरफुटीवर विरोधकांनी चिता व्यक्त करत पाच मुद्यांवर एकमत झाल्याचे बैठकीनंतर आयोजीत पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहिर केले.


नवीदिल्ली येथे आयोजीत इंडिया आघाडीच्या बैठकीस देशभरातील 25 विरोधी पक्षांच्या प्रमुख नेल्यांनी उपस्थिती लावली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)प्रमुख उद्धव ठाकरे व झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी व्हर्च्युअल द्वारे उपस्थित होते. देशाची आर्थिक स्थिती, महागाई, बेरोजगारीसह केंद्र सरकारच्या एसआयआर बाबत बैठकीत चर्चा झाली. नीट-यूजी व सीबीएससी पेपेरफुटी प्रकरणात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरही एकमत झाले.


त्याचबरोबर सरकारमधील घोटाळे, एसआयआर यासह विविध विषयी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांना लवकरच अधिकृत पत्र देण्याचंही बैठकीमध्ये ठरल्याचे जाहिर करण्यात आलं. बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी पत्रकार परिषदेत इंडिया आघाडीची सविस्तर भूमिका मांडत यापुढे विशेष मुद्यांवर सरकारशी संघर्ष करण्याचंही त्यांनी जाहिर केले.


पाच मुद्यांवर एकमत:

1) सरन्यायाधीशांना पत्र: मतदार यादीतील कथित गैरप्रकार आणि मतांची चोरी याविरोधात सन्यायाधीशांकडे अधिकृत पत्र सादर केले जाईल.

2) शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा: नटी-यूजी आणि सीबीएससी पेपरफुटी प्रकरणात लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यामुळे, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी

3) आर्थिक स्थितीवर बैठक : महागाई, वाढती बरोजगारी आणि शेतकर्‍यांचे प्रश्न यसा गंभीर विषयांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी.

4) आघाडीची नियमित बैठक: इंडिया आघाडीची सर्वपक्षीय बैठक आता दर दोन महिन्यांनी अयोजित केली जाईल, यापुढील बैठक 8 ऑगस्ट रोजी हैदराबाद येथे होणार आहे.

5) संसदेत समन्वय: संसदेच्या आगामी अधिवेशनात सर्व विरोधी पक्षांमध्ये मजबूत समन्वय राखला जाईल.

या पाच मुद्यांवर बैठकीत चर्चा होवून एकमत झाल्याचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Comments


bottom of page