विधानपरिषद निवडणुक: मतदानापूर्वीच महायुतीला 17 पैकी 6 जागांवर यश
- Navnath Yewale
- 1 hour ago
- 2 min read

राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे विधान परिषदेसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. पण मतदानाआधीच मोठा खेळ झाल्याचे पहायला मिळत आहे. महायुतीचे तब्बल सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. राज्यात 17 जागांवर निवडणुक होणार असून आज अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत होती. अनेक ठिकाणी बंडखोरीही झाली होती. महायुतीला बंडखोरी रोखण्यात यश आले असून महाविकास आघाडीला आठ ठिकाणी झटका बसला आहे.
महायुतीला 17 पैकी 6 जागांवर निर्विवाद बिनविरोध यश मिळवले आहे. यामध्ये ठाणे मतदारसंघ रवींद्र फाटक, कोकण मतदारसंघ अनिकेत तटकरे, यवतमाळ, वर्धा-गडचिरोली- चंद्रपूर मतदारसंघात भाजपचे अरुण लाखाणी पुणे मतदारसंघात विक्रम काकडे, आणि अहिल्यानगर मतदारसंघात भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत हायहोल्टेज ड्राम पाहायला मिळाला. या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठीची अखेरची मुदत गुरुवारी (दि.4) दुपारी 3 पर्यंत होती. यावेळी अपक्ष उमेदवार करण ससाणे यांनी आपला अर्ज मागे घेतला होता. यानंतर दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज बाद होण्यावरुन हायव्होल्टेज ड्राम झाला. अखेर भाजप व महायुतीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांची विधानपरिषद निवडणुकीच्या आहिल्यानगर मतदारासंघातून बिनविरोध निवड झाली आहे.
भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्यासह श्रीरामपूरचे काँग्रेसचे नगराध्यक्ष करण ससाणे, राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे शेवगाचे कमलेश गांधी व आकोल्याचे मच्छिंद्र धुमाळ यांनी अर्ज दाखल केले होते.
अहिल्यानगर निवडणुकीच्या रिंगणातून अर्ज माघारीच्या दिवशी कोण व कधी अर्ज मागे घेतो, याची उत्सुकता होती. सर्वात आधी दुपारी 1 च्या सुमारास मच्छिंद्र धुमाळ यांनी माघार घेतली. त्यानंतर पावणे दोनच्या सुमारास करण ससाणे व कमलेश गांधी यांनी माघार घेतली. गांधी यांना शेवगाव- पाथर्डीच्या भाजप आमदार मोनिका राजळे घेऊन आल्या होत्या. त्यानंतर पानसरेच्या आगमनाची प्रतिक्षा होती. माघारीसाठी 3 वाजेपर्यंतच मुदत होती. त्यामुळे ते कधी येतात, याची प्रतिक्षा तनपुरे समर्थकांना होती.
विधान परिषदेच्या अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत गुरुवारी (4 जून) अर्ज माघारीच्या अखेरच्या क्षणी ट्विस्ट आला. या निवडणुकीच्या रिंगणातील अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी आपल्यावतीने आपल्या अनुमोदकाने दाखल केलेल्या माघारीच्या अर्जाला आक्षेप घेतला.
मी कोणालाही प्राधिकृत केलेले नाही व कोणत्याही अर्जावर सही केलेली नाही. त्यामुळे माझा उमेदवारी अर्ज वैध (पात्र) गृहित धरला जावा, असे त्यांचे म्हणणे आहे. माझा अर्ज वैध मानला गेला नाही तर मी आत्मदहन करेन व माझे धड येथून जाईल, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला. याचवेळी त्यांनी राज्य पणन महासंघाच्या अध्यपदाचा राजीनामाही माध्यमांसमोर जाहीर केला.
दरम्यान, पानसरेंनी ऐनवेळी घेतलेल्या भूमिकेने खळबळ उडाली असून, प्राजक्त तनपुरेंची निवड बिनविरोध होईल असा दावा करणारे शहराचे आमदार संग्राम जगताप यांचीही काहीकाळासाठी धडधड वाढल्याचं दिसून आलं होतं. प्राजक्त तनपुरे सध्या भाजपाकडून अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारासंघाच्या विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार आहेत. त्यांच्या पक्षांतरानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटात आणि जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.



Comments