दिल्ली पोलिसांची कारवई; सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरुन रुग्णालयात हलवलं; अभिजीत दिपके यांचे गंभीर आरोप
- Navnath Yewale
- Jul 18
- 2 min read

नवी दिल्ली : गेल्या 20 दिवसांपासून बेमूदत उपोषणावर असलेले कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जबरदस्तीने आंदोलनस्थळावरुन उचलून घेऊन गेल्याचं समोर आलं आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केल्याचं पोलिसांच म्हणणं आहे. आता कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाबद्दल मोठी माहिती दिली आहे.
बेदमुदत उपोषणावर असलेले कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आलं आहे. दिल्ली पोलिस जंतर-मंतरवर कठोर कारवाई करत आहेत. ते लोकांना मारहाण करत आहेत आणि सोनम सर यांना बळजबरीने घेऊन जात आहेत, असं अभिजीत दीपके सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे. त्यावेळी त्यांनी सरकारच्या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे. दिल्ली पोलिसांनी मला मारहाण केली आहे आणि ताब्यात घेतले आहे, असंही अभिजीत दिपके म्हणाले.
डॉक्टरांनी दिलेल्या मेडिकल रिपोर्टनुसार, सोनम वांगचुक यांची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली असून त्यांच वजन नऊ किलांनी घटलं आहे. सोनम वांगचुकची प्रकृती खालावल्यानंतर शनिवारी जंतर मंतर आणि त्याभोवती आणि निवी दिल्ली जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘ आंदोलकांशी संवाद साधण्यास नकार देणारे हे सरकार केवळ बेजबाबदार नाही, तर अत्यंत क्रूर आहे’ अशा शब्दात कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला होता. “ उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि त्यांची प्रकृती व वैद्यकीय स्थिती लक्षात घेऊन,सोनम वांगचुक यांना योग्य अशा सरकारी रुग्णालयात नेण्यात आले आहे. ते सध्या वैद्यकीय देखरेखीखाली आहेत.” असं नवी दिल्लीचे डीसीपी सचिन शर्मा यांनी म्हटलं आहे.
अभिजीत दिपकेंना मारहाण, फरपटत नेलं: पोलिसांनी सोनम वांगचुक यांना उचलून नेलं, आणि अभिजीत दिपके यांना मारहान केल. तसचे, आंदोलकांना देखील पोलिसांनी मारहाण करत फरपटत नेल्याचा अरोप करण्यात येत आहे.
अभितीत दिपके म्हणाले की, ‘ पोलिसांनी शिवीगाळ करत मला मारहाण केली. हे दिल्ली पोलिस नाही तर आरएसएसचे गुंडे आहेत. देशात लोकशाही शिल्लक राहिली नाही, मोदी हे हुकूमशाह आहेत. सोनम वांगचुक यांना कुठे घेऊन गेले याची मला कल्पना नाही.
आंदोलकांनी आरोप केला की, पोलिसांनी त्यांचे फोन हिसकावले, काही आंदोलकांना मारहाण करत फरपटत नेले. आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरेाधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, सोनम वांगचुक यांना सफरगंज रुग्णालयात पोलिसांनी दाखल केल्याची माहिती आहे.
लोकशाही पायदळी तुडवली- अदित्य ठाकरे: दीपके यांना झालेल्या मारहाणीनंतर तसेच सोनम वांगचुक यांना जबरदस्ती पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “ भारतातील लोशाही बळाचा वापर करून निर्लज्जपणे पायदळी तुडवली जात असल्याचे जग पाहत आहे. एखाद्या अकार्यक्षम मंत्र्यांविरुद्ध विद्यार्थ्यांकडून केल्या जाणार्या शांततापूर्ण निदर्शनांनाही आता सहन केले जात नाही,’



Comments