top of page

परळीचे थर्मल कंत्राटदार अपहरण प्रकरण: पाच कोटी रुपयांची मागितली खंडणी; हिंगणघाट येथून तुकाराम मुंडेची सुटका

बीड: बीडच्या परळीमधून अपहरण केलेल्या तुकाराम मुंडे यांची वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील धोत्रा परिसरात सुटका झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव तुकाराम मुंडे असे आहे. या अपहरणाची बीडमध्ये जोरदार चर्चा आहे.


अपहरणकर्त्यांनी संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांकडे तब्बल 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची माहिती असून, पोलिसांचा दबाव वाएत असल्याची चाहूल लागताच आरोपींनी त्यांना धोत्रा गावाजवळील सुनसान रस्त्यावर डोळ्यांवर पट्टी बांधून सोडून पसार झाल्याचे सांगितले जात आहे. तुकाराम मुंडे (रा. परळी वैजनाथ) हे परळी येथील औष्णिक केंद्रात कंत्राटदार म्हणून कार्यरत होते. गुरुवारी (दि.4) दुपारी काम आटोपून घरी परतत असताना तीन अज्ञात इसमांनी त्यांचे जबरदस्ती चारचाकी वाहनातून अपहरण केले होते. या घटनेनंतर कुटुंबीयांकडे मोठ्या रकमेची खंडणी मागण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान बीड पोलिसांचे गुन्हे अन्वेषण पथक आरोपींचा शोध घेत विविध ठिकाणी तपास करत अमरावती पर्यंत पोहोचली होती.


दरम्यान, 7 जून रोजी धोत्रा परिसरातील रस्त्यालगत डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या अवस्थेत सोडण्यात आल्यानंतर तुकाराम मुंडे यसांनी मदतीसाठी हाक मारली. त्यावेळी त्या मार्गाने दुचाकीवरुन

जात असलेले प्रसन्ना घेमराज मांडवकर (रा. आंजदा वर्धा) यांनी त्यांना मदत केली. मुंडे हे घाबरलेल्या अवस्थेत असल्याने काहीतरी गंभीर प्रकार घडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांची विचारपूस केली. यावेळी मुंडे यांनी आपल्यासोबत घडलेली संपूर्ण आपबिती सांगितली.


प्रसन्ना मांडवकर यांनी प्रसंगावधान दाखवत तुकाराम मुंडे यांना अपल्या दुचाकीवरून हिंगणघाट पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी तातडीने त्यांच्या नातेवाईकांशी तसेच परळी पोलिसांशी संपर्क साधून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर तुकाराम मुंडे यांना पुढील तपासणीसाठी परळी वैजनाथ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल.

Comments


bottom of page