top of page

बीडमध्ये गुन्हेगारी घटनांचा आलेख वाढला?, परळीत एकापाठोपाठ खून, अपहरण, विनयभंग, खूनाच्या प्रयत्नाचे गुन्हे

बीड: मागील काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यात गुन्हेगारीने हैदोस घातला आहे, बीड जिल्हा गुन्हेगारांचा बालेकिल्ला होत चालल्याचा गुन्हेगारीच्या घटनांचा वाढता आलेख याचं भयान वास्तव मांंडत आहे. बीडच्या परळीत काही दिवसांपूर्वीच तोहिद खानचा अमाणुषपणे खून करण्यात आला. या हत्याकांडातील आरोपी सापडताच दुसर्‍या घटना घडल्या, ज्यामध्ये परळीतील कंत्राटदार तुकारम मुंडेचे अपहरण तिसरी घटना एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी तर चौथ्या घटनेत तू मला बोलत का नाहीस म्हणून तरुणीवर चाकून सपासप वार करून जीवे मारण्याच्या प्रयत्न. जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधीत राखण्याचा धनुष्य पेलणारे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन व पोलिस अधिक्षक नवनित कॉवत यांची गुन्हेगारांवर दहशत राहिलेली नाही, त्यांचा गुन्हेगारांवरील वचक संपला? या प्रश्नाला वाढत्या गुन्हेगारीमुळे एकप्रकारे दुजोरा मिळतोय. बीडच्या परळीतील वाढत्या गुन्हेगार्‍या, खून, अपहरण , विनयभंग आणि मुलींवर होणारे जिवघेणे हल्ले या वर कसा अंकुश बसेल? याबाबत तातडीने कायद्याच्या उपाय योजना कराव्यात अशी मागणी आता सामान्यांतून होत आहे.


14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग: माझ्यासोबत पळून नाही आलीस तर तुझ्या मामांना, आजी आजोबाला जिवंत सोडणार नाही, तुझे फोटो व्हायरल करील असे म्हणत एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग व पाठलाग करून धमकी दिल्या प्रकरणी परळी पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरोपी कृष्णा बाबुराव शिंदे रा. बेलांबा, ता. परळी याने एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला मैत्री करण्यासाठी वारंवार त्रास दिला.मुलीने त्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिचा पाठलाग करणे सुरू ठेवले. गल्लीमध्ये पीडित मुलगी दुध आणण्यासाठी गेलेली असताना पाठीमागे येऊन त्याने तिला पकडून लज्जा येईल असे कृत्य केले. तसेच “ तू माझ्यासी बोलत नाहीस’ तू माझ्यासोबत पळून नाही आलीस तर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करील, याशिवाय तुझ्या मामा व आजी आजोबांना जिवंत सोडार नाही अशी धमकी दिली. ही घटना 7 जूलै 2025 रोजी बेलांबा परिसरात घडल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. पीडितेने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितल्या नंतर (दि.5 जून,2026) रोजी कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत विविध कलमांतर्गत विनयभंग, जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा दाखल केला आहे.


माझ्यासोबत बोलत का नाहीस म्हणून तरुणीवर चाकुने हल्ला: परळी शहरातील पंचशील नगर परिसरात शिक्षणासाठी आलेल्या किरायाच्या रुमध्ये राहणार्‍या एका 23 वर्षीय तरुणावर चाकुने सपासप वार करून जीवघेणा हल्ला केल्याची घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जवळा (निजाम), ता. परंडा,जि. धाराशिव येथील एक तरुणी शिक्षणासाठी परळी शहरातील पंचशिल नगर परिसरात किरायाच्या रुममध्ये राहत होती. शुक्रवारी (दि.5) मध्यरात्री 12:00 च्या सुमारास संशयित आरोपी अनंत पाटोलबा गित्ते (रा. मालेवाडी, ता. परळी वैजनाथ ) हा पिडितेच्या घरी गेला. चारित्र्याच्या संशयावरुन दोघांमध्ये वाद झाल्यानंतर संशयिताने शिवीगाळ करत तू मला का बोलत नाहीस असे म्हणत तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर आरोपीने चाकूने तरुणीच्या उजव्या हातावर, पोटावर तसेच डाव्या हाताच्या दंडावर सपासप वार केले या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तीला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अहवालानुसार शनिवारी (दि.6) आरोपीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात जीवे मारण्याच्या उद्देशाने शस्त्राने जखमी केल्याचा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थर्मलचे कंत्राटदार तुकारम मुंडे यांचे अपहरण: परळी येथील थर्मल पॉवर स्टेशनचे कंत्राटदार शहरातीलटी.पी.एस. कॉलनीतील रहीवासी तुकाराम पंढरीनाथ मुंडे (वय 54 ) हे दि. 4 जून रोजी दुपारपासून अचानक बेपत्ता झाले आहेत. त्यांचे भरदिवसा अपहरण झाल्याचे समोर आल्याने परळी तालुक्यात खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अधिकृतपणे हरवल्याची नोंद करण्यात आली असून तपास यंत्रणा अलर्टमोडवर आहे.


प्राप्त माहितीनुसार गुरुवारी (दि.4 जून ) दुपारी 2:00 वाजण्याच्या सुमारास तुकाराम मुंडे हे दाऊतपूर रोड भागातून अचानक बेपत्ता झाले. बेपत्ता हाण्याच्या काही क्षणापूर्वी त्यांनी आपल्या पुतण्याला फोन केला होता, “ मी माझी स्कूटी दाऊतपूर रोडवरील साईनाथ विटभट्टीजवळ लावून बसने पारस येथे जात आहे, ” अशी माहिती दिली होती. मात्र या संवादानंतर अवघ्या काळी वेळातच त्यांचा मोबाईल फोन अचानक बंद झाला. फोन बंद झाल्यामुळे चिंतेत पडलेल्या नातेवाईकांनी तातडीने दाऊदपूर रोडवरील साईनाथ विटभट्टी गाठली. तेथे तुकाराम मुंडे यांची स्कूटी उभी असलेली अढळून आली. तसेच स्कूटीच्या अगदी शेजारीच त्यांची एक चप्पलही पडलेली नातेवाईकांना मिळून आली. विद्युत केंद्राजवळ त्यांना काही अज्ञात इसमांनी जबरदस्तीने वाहनात बसवून पळवून नेल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.


दरम्यान, थर्मल पॉवर स्टेशनचे कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लाय असोसिएशन , परळी च्या वतिने शनिवारी (दि.6) तहसीलदार यांच्यामार्फत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. असोसिएशनचे अध्यक्ष अंगद हाडबे, सचिव शेखर स्वामी यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनामध्ये कंत्राटदार तुकाराम मुडे अपहरण प्रकरणाचा तात्काळ तपास लावून त्यांचा शोध घेण्यात यावा व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Comments


bottom of page