पाटोद्यात सकल मराठा आक्रमक: पोलिस ठाण्यात ठिय्या अजय बारस्कर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

बीड: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह सहकार्यांवर अजय बारस्कर महाराज सातत्याने आरोप करत आहेत. बारस्कर यांनी जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या सहकार्यांच्या विरोधात ईडी,आयकर विभागाकडे तक्रार देखील केली. जरांगे पाटील समर्थक आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपांचा वॉर सुरू आहे. त्यातच आता पाटोदा तालुक्यातील सकल मराठा समाज आक्रमक झाला. बारस्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पाटोदा सकल मराठा समाजाच्या वतिने पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील सरकारच्या शिष्टमंडळाच्या अश्वासनाने पाटोदा येथे आंदोलन स्थगित केल्यापासून त्यांच्या विरोधकांमध्ये भर पडली आहे. सुरुवातीपासूनच जरांगे पाटलांवर टिका करणारे अजय बारस्कर महाराज यांनी जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या सहकार्यांवर गंभीर आरोप केले. याशिवाय जरांगे पाटील व त्यांच्या सहकार्यांच्या विरोधात बारस्कर महाराज यांनी ईडी, आयकर विभागाकडे चौेकशीची तक्रार केली आहे. सातत्याने सोशल मीडियावर, माध्यमांसमोर बारस्कर महाराज जरांगे यांच्यावर बेछुट टिका करत गंभीर आरोप करत आहेत.
जरांगे पाटील यांच्या नातेवाईकांनी सिरसमार्ग (ता. गेवराई) येथे 9 एक्कर जमिन घेतल्याचा आरोप केला.बारस्कर महाराज सातत्याने जरांगे पाटलांचा एकेरी शब्दात उल्लेख करत पुरव्या शिवाय बेछूट आरेप करत आहेत, तक्रारीनुसार कायदेशीर चौकशी करून दोषींवर कारवाई होईलच, पण मराठा आरक्षणाचे नेते जरांगे पाटील यांना शिवराळ भाषेत एकेरी उल्लेख करत बारस्कर महाराज जानिवपूर्वक कोणाच्यातरी सांगण्यावरुन जरांगे पाटील यांची बदनामी करत असल्याचा आरोप पाटोदा सकल मराठा च्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला आहे. कायम प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी बारस्कर जरांगे पाटील यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत असून सरकारने वेळीच त्यांना लगाम घालावा अन्यथा राज्यात कायदासुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
पाटोदा शहर सकल मराठा समाजाच्या वितने सोमवारी (दि.27) पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत आंदोलकांनी बारस्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी बारस्कर महाराजांचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली.



Comments