बंडखोरांनी ‘ टीएमसी’ पक्ष फोडला, ममता बॅनर्जींसाठी संकटकाळात हा बडा नेता ढाल बनला
- Navnath Yewale
- 2 days ago
- 1 min read

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींना सत्ता गमवावी लागली. हा धक्का सहनकरत नाही, तोच तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी राजकीय फूट पडली आहे. टीएमसीचे जवळपास 58 आमदार आणि 20 खासदार फुटले आहेत. आमदारांच्या बंडखोरीनंतर खासदारांनीही वेगळा गट स्थापन करत एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पण एकीकडे हे धक्के सहन करणार्या माजी मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.
एकेकाळी पश्चिम बंगालसारख्या राज्याची 15 वर्षे सत्ता ताब्यात राखलेली टीएमसीसारखा मोठा पक्ष विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पूर्णपणे कोलमडला आहे. आमदार-खासदारांच्या एकामागोमाग बंडखोरीमुळे ममता बॅनर्जी स्वत: हादरल्या आहेत. तृणमूलचे खासदार सौगत रॉय यांनी मोठी राजकीय निर्णय घेतला आहे.
खासदार सौगत रॉय यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी भाजपने आपल्याला पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिल्याचा दावा केला आहे. मात्र, एकीकडे पक्षफुटत असताना त्यांनी भाजपकडून देण्यात आलेली पक्षप्रवेशाची ऑफर नाकारली आहे. माजी मुख्यमंत्री व टीएमसी सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसमध्येच राहणार असल्याचा इरादा बोलून दाखवला आहे. यावेळी त्यांनी हो, मला भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर मिळाली होती. मात्र मी ती नकारली.
मी ज्या पक्षाच्या चिन्हावर निडणूक जिंकली आहे, मी त्याच पक्षात राहणार असल्याची मातिी त्यांनी दिली आहे. राज्यसभेचे वरिष्ठ खासदार सुखेंदू रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडत पक्षनेतृत्वावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानंतर सौगत रॉय यांनीही आपली भूमिका मांडली.
सुखेंदू शेखर रॉय यांनी खासदारकीचाही राजीनामा दिला असून त्यांनी भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या निवासस्थानी भेट दिल्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मात्र सुखेंदू शेखर रॉय यांचा पक्षत्याग फर महत्व देण्यासारखा नसल्याचा टोलाही सौगत रॉय यांनी लगावला आहे.



Comments