top of page

बीडमध्ये किरकोळ वादातून रक्तरंजीत हल्ला ; चाकूने सपासप वार आाचार्‍याला जागीच संपवलं, एक जण गंभीर; परसिरात खळबळ

बीड: हॉटेलमधील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांची निर्घुण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणावरून जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असतानाच आता अंबोजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे शनिवारी मध्यरात्री चाकूने सपासप वार करत आचार्‍याला जागील संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर तरुणांच्या नातेवाईकांनी आंबाजोगाई ग्रामणी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी ठिय्या आंदोलन केले. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ज्ञाणेश्वर उत्तरेश्वर वाकडे असे हत्या झालेल्या तरुणाचा नावे आहे .


बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथे दि.20 जून रोजी हॉटेलमधील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले याची निर्घुण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी 10 आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विशेश तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांच्या अटकेची मागणी केली जात आहे. या मागणीसाठी विलास घुले यांच्यसा नतोवाईक व स्थानिकांनी तीव्र आंदोलन केले होते. तसेच राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनीही अधिवेशनामध्ये हा मद्दा उपस्थित करत कारवाईची मागणी केली होती.


त्यामुळे या प्रकरणावरून जिल्ह्यासह राज्यातील रजाकीय वातारवण चांगलेच तपासे असतानाच आता पुन्हा शनिवारी (दि. 11) तरुणाच्या निर्घुण हत्येमुळे बीड पुन्हा हादरले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे शनिवारी मध्यरात्री ज्ञाणेश्वर वाकडे या 21 वर्षीय तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली. किरकोळ वादातून ज्ञाणेश्वर वाकडे याच्यावर चाकूने सपासप वार करत त्याला जागीच संपवण्यात आले. या भयंकर घटनेनंतर मृत तरुणाच्या नातेवाईकांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी ठिय्या आंदोलन केले.


या बाबत मिळालेली माहिती अशी की, ज्ञाणेश्वर वाकडे हा पट्टीवडगाव येथे आपल्या कुटंबीयांसोबत राहत होता. तो गेल्या एक वर्षापासून लातूरजवळील हायवेवरील एका हॉटेलवर आचारी म्हणून काम करत होता. दरम्यान, शनिवारी रात्री 11:30 वाजता तो अंबाजोगाईवरून घाटनांदूरच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून जात होता. यावेळी त्याच्यासोबत त्याचे आणखी दोन मित्रही होते. हे सर्व घाटनांदूर येथील साठे चौकात आले असता तेथे त्यांचा काही जणांसांबत वाद झाला. या वादातून ज्ञाणेश्वरवर चाकूने सपासप वार करण्यात आले. हा हल्ला इतका भयंकर होता की , ज्ञाणेश्वरचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत आलेल्या दोन मित्रांपैकी एक गंभीर जखमी झाला असून दुसर्‍याने घटनास्थळावरून वेळीच पळ काढल्यामुळे तो सुदैवाने या हल्ल्यातून बचावला.


जखमींवर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान मृत ज्ञाणेश्वरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. नातेवाईकांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पावित्रा नातेवाईकांनी घेतल्याने प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली.

Comments


bottom of page