top of page

भाजपमध्ये उभी फूट!, मोदींना हटवण्यासाठी षडयंत्र; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

मुंबई: लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पंतप्रधान मोदींनी विधेयक नामंजूर होण्यावरुन काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. तर काँग्रेसकडूनही टीकेला प्रत्युत्तर दिले जात आहे. महाराष्ट्रात महायुतीनेही विरोधकांच्या भूमिकेवरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. महायुतीकडून राज्यात एका कोटी महिलांच्या स्वाक्षर्‍या गोळा करण्यात येणार आहे. तसेच राज्यभरात मेळावे आयोजित केले जाणार आहेत. महिला आरक्षण विधेयक नामंजूर होण्यावरुन राजकारण तापलं असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी आज मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊतांनी देशासहित राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. तर महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर सुरू झालेल्या राजकारणावरही राऊतांनी मोठं विधान केलं आहे. संजय राऊत म्हणाले की, कोणतेही विधेयक पाडण्यात आलेले नाही. ज्याचा संबंध महिला आरक्षणाशी आहे. भाजप किंवा भाजपमधील एका गटाला प्रधानमंत्री पदावरुन नरेंद्र मोदींना घालवण्याचे वेध लागले आहेत. त्या गटांमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत की मला माहित नाही.


‘ मोदी पदावरुन गेल्यानंतर या देशाची सत्ता आपल्याकडे राहावी, असे या गटाला वाटते. त्यासाठी 850 खासदारांचं षडयंत्र आहे. या माध्यमातून डीलिमिटेशन निर्माण करण्यासाठी हे बिल आणण्यात आलं आहे. असा आमचा आरोप नसून सत्य आहे,महिलांना आरक्षण देण्यासाठी आताही 543 खासदारांमध्ये तुम्ही 180 महिलांना ताबडतोब आरक्षण द्या, त्याच्यामध्ये आमच्या जागा जाणार असेल, तरी आम्ही तयार आहोत, असे राऊत यांनी सांगितले.


‘नरेंद्र मोदी यांनी जर मनात आणलं असतं, तर हे विधेयक मंजूर करून घेऊ शकले असते. परंतु नरेंद्र मोदी यांची खरोखर इच्छा असते, तर ते विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांनी स्वत: चर्चा करून अनेकांचे मन वळवलं असतं. या बिलाचे सूत्रधार अमित शाह होते. डीलिमिटेशन बिलाचे महिला आरक्षण नाही, मी परत सांगतो डी डिमिटेशनच्या बिलाला अमित शाह यांनी गुलाबी साडी नेसून महिला आरक्षण म्हणून आणलं. नटापटा केला बुवाची बाई केली आणि त्याला सादर केलं. विधेयकाचे सूत्रधार अमित शाह होते. हे बिल म्हणजे त्यांच्या पुढल्या राजकारणाची नांदी आहे. 850 खासदार बनवून आपल्या पद्धतीने निवडणुका लढायच्या आणि जिंकायच्या, अशी टीका राऊत यांनी केली.


‘ तुमची वकील पट, आम्ही वकिली न शिकता वकील झालो. कारण आम्ही देशासाठी तुरुंगात गेलो. तुम्हीच घातलं होतं आणि तुरूंगातील जो वकील असतो, तो तुमच्या डिग्र्रीच्या पेक्षा भारी असतो. अमित शाह यांनी देशातल्या सर्व राजकीय पक्षांना फोन केले. मी कोणाचं व्यक्तिगत नाव घेणार नाही. देशातल्या बहुतेक सर्व राजकीय पक्षाला फोन केले. त्याचबरोबर या विधेयकाला पाठिंबा देऊ नका म्हणून काउंटर फोन सुद्धा त्यांच्याच पक्षातून फोन करण्यात आले. पण हे डीलिमिटेशन बिल भाजप अंतर्गत वादाचा विद्रोह आहे, असा आरोप राऊतांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Comments


bottom of page