‘आप’ मधील फुटीनंतर अण्णा हजारे संतापले, थेट नव्या कायद्याची मागणी

आहिल्यानगर : अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा फटका बसला आहे. राघव चड्डा यांच्यासह पक्षातील सात राज्यसभा खासदारांनी पक्षाला रामराम करत भाजपची वाट धरली आहे. त्यामुळे दिल्ली आणि पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. खासदार फुटल्यानंतर आम आदमी पक्षाने भाजपवर सडकून टीका केली आहे. तसेच विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. अरविंद केजरीवाल यांचे एकेकाळचे सहकारी आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजार ेयांनी राजकीय घडामोडीवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
अण्णा हजारे म्हणाले की, ‘ पक्ष टिकवण्यासाठी कायदा तयार होणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या मर्जीप्रमाणे कोणीही पक्ष बदलणार नाही. सत्ता आणि पैसा याच्या लालचमध्ये येऊन नेते इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जात आहेत, मनमर्जी प्रमाणे पक्ष बदलत आहेत. त्यामुळे लोकांनी निवडून देताना चारित्र्यशील लोकं निवडून दिलं पाहिजे. हे जे चराललं आहे ते स्वार्थासाठी चाललं आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असं चाललं आहे. आज समाज आणि देश डोळ्यासमोर राहिला नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.



Comments