आम आदमी पार्टीत उभी फूट, राघव चढ्डांचा भाजप प्रवेश अरविंद केजरिवाल यांचा एका वाक्यात भाजपवर हल्ला; आपचे 7 खासदार भाजप अध्यक्षांच्या भेटीला

नवी दिल्ली: आम आदमी पक्षात मोठी फूट पडली आहे. खासदार राघव चढ्डा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सोबतच आप पक्षाच्या इतरही खासदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर आपच्या त्या सातही खासरदारांनी भाजप कार्यालयात जाऊन अध्यक्षांची भेट घेतली आहे.
आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्डा यांनी थेट भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासह अशोक मित्तल, संदीप पाठक तसेच एकूण सात खासदारांनी भाजपमध्ये सामील होण्याचं ठरवलं आहे. थेट पत्रकार परिषद घेऊन राघव चढ्डा यांनी तशी माहिती दिली आहे. या अपडेटनंतर आपचे 7 खासदार भाजप अध्यक्ष नीतीन नबीन यांना भेटण्यासाठी भाजप कार्यालयात पोहोचले.
गेल्या काही दिवसांपासून त्यांचे पक्षासोबत वाद चालू होते. पक्षाच्या धोरणांबाबत त्यांनी जाहीर नराजीही व्यक्त केली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपली खदखद बोलून दाखवली होती. त्यानंतर आता त्यांनी थेट भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी आपल्या एक्स (ट्विटर) वर पोस्ट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते पोस्टमध्ये म्हाणाले की, “ भाजपने पुन्हा एकदा पंजाब्यांसोबत धक्का (अन्याय) केला.”
भाजमध्ये कोण सामील होणार?: राघव चढ्डा, अशोक मित्तल, स्वाती मालीवाल, हरभजन सिंग, संदीप पाठक, विक्रमजित सिंह साहनी, राजेंद्र गुप्ता
ईडीचा छापा टाकला आणि फोडले-संजय सिंह: दुसरीकडे ‘आप’ खासदार संजय सिंह यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हणाले की“ ऑपरेशन लोटसचा खेळ खेळला जात आहे. आमच्या खासदारांना फोडले जात आहे. त्यांना आपल्या पक्षात सामील करून घेतले जात आहे. ईडी-सीबीआयचा वापर केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच अशोक मित्तल यांच्याकडे ईडीचा छापा पडला होता. या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. ईडीचा छापा पडला आणि त्यांना फोडले. याचा अर्थ भीती दाखवून आणि प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर करून ‘ ऑपरेशन लोटस’ चालवले जात आहे.”
मी त्यांच्या मैत्रीच्या लायकीचा नव्हतो कारण.. -राघव चढ्डा : खासदार राघव चढ्डा म्हणाले “ मी गोष्टी चांगल्या करण्याचा प्रयत्न करत होतो. मी स्वत:ला पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर केले. कारण मला त्यांच्या गुन्ह्यात सहभागी व्हायचे नव्हते. मी त्यांच्या मैत्रीच्या लायकीचा नव्हतो. कारण मी त्यांच्या गुन्ह्यात सामील नव्हतो. आमच्याकडे दोनच पर्याय होते. एक तर राजकारण सोडणे किंवा आपल्या अनुभवासह सकारात्मक राजकारण करणे. म्हणूनच आम्ही निर्णय घेतला की, राज्यसभेतील ‘आप’चे दोन - तृतीयांश खासदार स्वत:ला भाजपमध्ये विलीन (मर्ज) करत आहोत.”



Comments